ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
By Admin | Updated: December 24, 2015 01:15 IST2015-12-24T01:15:07+5:302015-12-24T01:15:07+5:30
जिल्ह्यात २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी तालुकानिहाय तारखा देऊन विभागीय ...

ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
चंद्रपूर : जिल्ह्यात २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी तालुकानिहाय तारखा देऊन विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.२ चंद्रपूर येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु बरेच उमेदवार दिलेल्या तारखेला उपस्थित झाले नव्हते. जे उमेदवार उपस्थित नव्हते त्यांनी पुढच्या तारखांना उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील उमेदवारांनी २८ डिसेंबर रोजी तर चंद्रपूर, भद्रावती व कोरपना तालुक्यातील सदस्यांनी २९ डिसेंबर, राजुरा, जिवती व गोंडपिंपरी तालुक्यातील उमेदवारांनी ३० डिसेंबर, पोंभूर्णा, सावली, मूल व बल्लारपूर येथील उमेदवारांनी ३१ डिसेंबरला तर चिमूर व नागभीड येथील उमेदवारांनी १ जानेवारी २०१६ ला तर ब्रह्मपुरी तालुक्यातील उमेदवारांनी २ जानेवारी रोजी मूळ दस्तऐवजासह विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. २ चंद्रपूर या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उपस्थित राहावे, असे संशोधन अधिकारी विजय वाकुलकर यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)