३१ मार्चनंतर टीव्हीवर दिसणार मुंग्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:20 IST2019-03-20T22:19:48+5:302019-03-20T22:20:08+5:30

ग्राहकांना आवडीचे चॅनल्स निवडण्यासाठी ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी आॅर्थटी आॅफ इंडियाने नवीन नियम लागू केले. या नियमानुसार केबल चालकांनी ग्राहकांना कशी सेवा द्यावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले. येत्या ३१ मार्च २०१९ नंतर जुनी चॅनल्स सेवा पूर्णत: बंद होणार आहे.

Ants appear on TV after March 31! | ३१ मार्चनंतर टीव्हीवर दिसणार मुंग्या!

३१ मार्चनंतर टीव्हीवर दिसणार मुंग्या!

ठळक मुद्देट्रायची मुदत संपणार : केबलचालक भरताहेत ग्राहकांकडून पॅकेज फार्म

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्राहकांना आवडीचे चॅनल्स निवडण्यासाठी ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी आॅर्थटी आॅफ इंडियाने नवीन नियम लागू केले. या नियमानुसार केबल चालकांनी ग्राहकांना कशी सेवा द्यावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले. येत्या ३१ मार्च २०१९ नंतर जुनी चॅनल्स सेवा पूर्णत: बंद होणार आहे. ग्राहकांनी पॅकेजनुसार चॅनेल निवड केली नाही तर सर्व वाहिन्या बंद होऊन टीव्हीवर केवळ मुंग्या दिसण्याची वेळ येणार आहे.
टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाच्या वतीने केबल व डिश टीव्ही चॅनल्स सेवा धोरणामध्ये बदल केले आहे. जुन्या पद्धतीमध्ये ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत तफावत असून वेगवेगळे शुल्क आकारण्याचा प्रकार सुरू आहे. सेवा शुल्कातील हा फरक दूर करण्यासाठी ट्रायने नवे धोरण जाहीर केले. ट्रायने जाहीर केलेले नवीन धोरण केबलधारकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. १३० रूपयांमध्ये १०० चॅनेल दाखविणे केबलधारकांना लागू केले आहे. ग्राहकांनी नव्या चॅनल्सची मागणी केल्यास शुल्क आकारण्याची मुभा आहे. ट्रायच्या आदेशानुसार केबल चालकाची गोल्ड, सिल्वर, डायमंड एकूण असे पाच पॅकेज तयार केले. यातील पॅकेज निवडण्याचे स्वतंत्र ग्राहकांना आहे. परंतु शहरातील काही केबलचालक स्वत:हून ग्राहकांच्या पॅकेज निवडीचे फार्म भरून घेत आहेत, असा आरोप ग्राहकांनी केला. यामुळे ट्रायच्या नियमाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३१ मार्चपासून जूनी चॅनेल सेवा बंद होणार आहे. केबल चालकांनी न्यायलयात याचिका दाखल केली. १ एप्रिलपासून नवीन सेवा सुरू होणार ट्रायच्या नियमानुसार ग्राहकांनी पॅकेजमधून चॅनल्स निवड करणे गरजेचे आहे. न्यायालयाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे स्पष्ट नाही. मात्र, जुनी सेवा बंद होण्यासाठी केवळ दहा दिवस शिल्लक राहिले आहेत.
अनेक चॅनेल बंद
केबल चालकांनी चॅनल्स पॅकेज तयार केले. याकरिता नवीन शुल्क आकारणी केली आहे. चंद्रपूर शहरातील हजारो ग्राहकांनी नवीन पॅकेज फार्म भरून घेतले. हे काम सुरू असतानाच मुदतवाढीचा निर्णय झाला. त्यामुळे फार्म भरून घेण्याचे काम काही प्रमाणात थंडावले. हजारो ग्राहकांच्या घरी हे पॅकेज फार्म पडून आहेत. फार्मचे संकलन झाले नाही. मात्र, अनेक चॅनल्स दिसणे बंद झाले आहेत. केबल चालक व ग्राहकांमध्ये नवीन दरावरून वाद होऊ नये, या दृष्टीने संबंधित प्राधिकरण तोडगा काढेल काय, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Ants appear on TV after March 31!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.