ताडोबा पर्यटकांच्या सेवेत आणखी एक मिनीबस
By Admin | Updated: June 5, 2016 00:37 IST2016-06-05T00:37:40+5:302016-06-05T00:37:40+5:30
वनविकास महामंडळ उत्तरचंद्रपूर यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वसंध्येला ताडोबातील वनभ्रमंतीसाठी चंद्रपूर

ताडोबा पर्यटकांच्या सेवेत आणखी एक मिनीबस
चंद्रपूर : वनविकास महामंडळ उत्तरचंद्रपूर यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या पुर्वसंध्येला ताडोबातील वनभ्रमंतीसाठी चंद्रपूर येथून २१ आसनाची मिनीबसचा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेनसिंह चंदेल यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कर्यालयातून हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जी.पी.गरड, महाव्यवस्थापक एस.एस.डोळे, उपसंचालक जी.पी.नरवणे, ए.एस.कळसकर, विभागीय व्यवस्थापक एस.बी.पाटील, भाजपचे ग्रामीण अध्यक्ष हरीष शर्मा आदी उपस्थित होते. सदर बसमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला असून रोज ४२ पर्यटकांना सुविधा मिळत असल्यामुळे जनतेमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. नवीन बस रोज सकाळी ६ वाजता व दुपारी २ वाजता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालय मुल रोड चंद्रपूर येथून निघेल.
या बसमध्ये प्रति व्यक्ती ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याकरिता देश-विदेशातून अनेक पर्यटक येत आहेत. सध्या ताडोबातील आॅनलाईन बुकींग फुल असल्यामुळे तसेच स्थानिक लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आणखी एका बसची सुरूवात करण्यात आलेली आहे. निसर्गप्रेमी पर्यटकांना या बसच्या माध्यमातून लाभ घ्यावा, असे आवाहन वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक सुधाकर डोळे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)