३३१ कोटी ८६ लाखांचा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित

By Admin | Updated: January 27, 2015 23:31 IST2015-01-27T23:31:48+5:302015-01-27T23:31:48+5:30

सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना मिळून सन २०१५-१६ साठी ३३१ कोटी ८६ लाख ४३ हजाराचा जिल्हा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे.

Annual plan of Rs. 331 crores 86 lacs proposed by small group | ३३१ कोटी ८६ लाखांचा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित

३३१ कोटी ८६ लाखांचा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित

चंद्रपूर: सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना मिळून सन २०१५-१६ साठी ३३१ कोटी ८६ लाख ४३ हजाराचा जिल्हा वार्षिक आराखडा लघु गटाकडून प्रस्तावित करण्यात आला आहे.
आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली लघु गटाची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हसेकर, मनपाआयुक्त सुधीर शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, अंजली घोटेकर व जिल्हानियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे आदी उपस्थित होते.
सर्वसाधारण योजना १३५ कोटी ३ लाख, अनुसूचित जाती उपयोजना ६३ कोटी २९ लाख व आदिवासी उपयोजना १३३ कोटी ५४ लाख ४३ हजार असा एकूण ३३१ कोटी ८६ लाख ४३ हजार रुपयाचा जिल्हा वार्षिक आराखडा लघु गटाने प्रस्तावित केला आहे. बैठकीत सन २०१४-१५ च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. बहुतांश अंमलबजावणी यंत्रणानी खर्च केला असून उर्वरीत खर्च ३१ मार्च पूर्वी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीत पूर्ननियोजन व समर्पित निधीबाबत चर्चा करण्यात आली. ज्या विभागाना अतिरिक्त निधीची आवश्यकता होती त्यांना उपलब्ध निधीच्या प्रमाणात निधी देण्याची शिफारस समितीने केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Annual plan of Rs. 331 crores 86 lacs proposed by small group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.