रयत संस्थेची वार्षिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:34+5:302021-04-19T04:25:34+5:30
अमरीन शेख सेट परीक्षा उत्तीर्ण चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील अमरीन शेख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतलेली ...

रयत संस्थेची वार्षिक सभा
अमरीन शेख सेट परीक्षा उत्तीर्ण
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील अमरीन शेख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतलेली सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व बहिणीला दिले आहे. तिला परीक्षेसाठी रसायनशास्त्राच्या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, रसायनशास्त्र प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांनी कौतुक केले आहे.
सर्प व पक्षी बचाव प्रशिक्षण शिबिर
चंद्रपूर : कारवा, बल्लारपूर वनपरिक्षेत्रातर्फे सर्प व पक्षी बचाव प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी बल्लारपूर वनविभागाचे आरएफओ संतोष थिपे, आरओ रुदंन काटकर उपस्थित होते. शिबिरार्थ्यांना सर्प व पक्षी बचाव याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.
चंद्रपूर येथे मूलनिवासी मेळावा
चंद्रपूर : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मूलनिवासी मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन पीपल्स पार्टी ऑफ डेमोक्रेटिकचे सचिव एच. सी. सहारे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी बामसेफचे जिल्हा महासचिव देवानंद रायपुरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र खंडाळे, आदी उपस्थित होते.
एस. आर. एम कॉलेजचे सुयश
चंद्रपूर : स्थानिक एस. आर. एम कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली येथील विद्यार्थिनी श्रद्धा नत्थू किन्नाके, प्रवीण भोयर, राजेश गोंविदा हजारे यांनी सहायक पदासाठी आवश्यक असणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले. गुणवंतांचे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
संवादिनी चंहादे भीमगीत स्पर्धेत अव्वल
चंद्रपूर : भावधारा कला मंच चंद्रपूरतर्फे बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऑनलाईन बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत संवादिनी उमेश चहांदे हिने विशेष पुरस्कार पटकाविला आहे. प्रमोद गावंडे यांनी आभार मानले.
दिवसेंदिवस ध्वनी प्रदूषणात वाढ
चंद्रपूर : वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे; मात्र प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली असताना या निणर्याची अंमलबजावणी होत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदार ट्रकांद्वारे ओव्हरलोड वाळू व मुरुम वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे.
लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्या
चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते; मात्र या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.
धोकादायक पुलाला कठडे लावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.
अवैध वाहतुकीला निर्बंध घालावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला असून, याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असून, यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे वाहतूक विभाग, तसेच परिवहन विभागाने लक्ष ठेवून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, जिवती, ब्रह्मपुरी, चिमूर, सावली या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. यामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला
चंद्रपूर : सध्या जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. तेलाचे भाव तर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ८० ते ९० रुपयांना मिळणारे तेल पॉकेट आता १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडत आहे. अन्नदाता बळिराजाच्या शेतमालाला मात्र आजही भाव ‘जैसे थे’ असल्याची स्थिती दिसून येत आहे. बळिराजा पुरता हतबल झालेला दिसत आहे. आता तर आणखी पेट्रोलच्या दरातही वाढ केली आहे.
शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात अस्वच्छता आहे. विशेषत: प्रशासकीय भवन परिसर सोडला तर इतर कार्यालयामध्ये अस्वच्छता बघायला मिळते. भिंतीवर व पायऱ्यावर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येते. या प्रक्रियेत जनतेसोबतच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आहे.