जातीय जनगणनेचे आकडे घोषित करा : मुख्यमंत्र्यांना निवेदन

By Admin | Updated: August 4, 2015 00:39 IST2015-08-04T00:39:50+5:302015-08-04T00:39:50+5:30

२०१३ ला केलेल्या जातीय जनगणनेचे विस्तृत आकडे घोषित करुन भारतीय समाज जिवनाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील सुस्पष्ट चित्र देशवासीयांसमोर मांडण्यात यावे,..

Announce caste census figures: request to CM | जातीय जनगणनेचे आकडे घोषित करा : मुख्यमंत्र्यांना निवेदन

जातीय जनगणनेचे आकडे घोषित करा : मुख्यमंत्र्यांना निवेदन

चंद्रपूर : २०१३ ला केलेल्या जातीय जनगणनेचे विस्तृत आकडे घोषित करुन भारतीय समाज जिवनाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील सुस्पष्ट चित्र देशवासीयांसमोर मांडण्यात यावे, अशी मागणी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षात भारतीय जनतेच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक मागासलेपणा दूर करण्यात सरकारला किती यश आले. प्रशासनात मागास जातीचा सहभाग किती वाढला ही आकडेवारी २०१३ च्या जातीय जनगणनेत करण्यात आली आहे. ती केंद्र सरकारने जनतेसाठी जाहिर करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी मुख्य संघटक बळीराज धोटे, पी. एम. जाधव, राजकुमार जवादे, विनोद सोनटक्के, डॉ. बाळकृष्ण भगत, दिलीप होरे, विजय शिंदे, सूर्यभान झाडे, सतिश निमसरकर, नितीन डोंगरे, राकेश कालेशवार, अशोक मेश्राम, योगेश पडवेकर आदीचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Announce caste census figures: request to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.