अण्णाभाऊ साठे रस्त्यावर लढणारे योद्धे होते
By Admin | Updated: September 6, 2016 00:44 IST2016-09-06T00:44:14+5:302016-09-06T00:44:14+5:30
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व लढा समाजातील सर्वच स्तरातील सर्वांगिण असल्याने त्याला एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवून नका.

अण्णाभाऊ साठे रस्त्यावर लढणारे योद्धे होते
संजय धोटे : जयंती समारोह व नवोदित कवी संमेलन
गडचांदूर : अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व लढा समाजातील सर्वच स्तरातील सर्वांगिण असल्याने त्याला एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवून नका. त्यानी १८४२ च्या स्वातंत्र्य लढा, चले जावचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो वा गोवा मुक्ती लढ्याचे आंदोलन असो. त्यात त्यांनी शाहीर अमर शेख व शाहीर गव्हाणकर यांच्या जोडीेने या लढ्याला फार मोठे योगदान दिले. म्हणून अशा देशभक्त नेत्याची जयंती सर्वांनी मिळून साजरी केली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अॅड. संजय धोटे यांनी केले.
ते गडचांदूर येथील स्व. भाऊराव पा. चटप आश्रम शाळेच्या स्वामी समर्थ सभागृहातील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया तालुका कोरपना व भीमसेना बहुउद्देशिय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह व नवोदित कवी संमेलनाच्या विचारपिठावरुन बोलत होते.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं (आ.) चे जिल्हा महासचिव सिद्धार्थ पथाडे होते. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, अण्णाभाऊ साठेच हे खऱ्या अर्थाने वास्तववादी साहित्यिक होते. त्यांनी जीवनात बकाल आणि कंगाल वस्तीत पाहिले, भोगले व अनुभवले, तेच त्यांनी आपल्या साहित्यात मांडले. त्यांच्यासाठी ते आयुष्यभर लढले आणि लिहित राहिले. माजी प्राचार्य जी.एस. कांबळेनी अण्णाभाऊ हे पहिलेभलेही साम्यवादी चळवळीकडे झुकले होते. परंतु नंतर आंबेडकरी विचारधारेशिवाय गतंत्यर नाही,असे कळून चुकल्यानेच त्यांच्या साहित्याचा व चळवळीचा कल आंबेडकरी चळवळीकडे वळले. प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांनी श्रमिकांची व दलदलीमध्ये फसलेल्यांच्या घामाची महती गाणारा व त्यांनाच आपल्या साहित्याचा नायक बनवून त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविणारा खरा साहित्यसम्राट व लोकनेता होता, असे म्हणाले. तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सेलोकर, गडचांदूरचे माजी सरपंच रहुफभाई, तुळशीराम भोजेकर, रोहण काकडे, भीमरव कंचकटले, तुकाराम जाधव, ईश्वर देवगडे, किशोर रायपुरे, सुर्यकांत कांबळे यांचे यथोचित भाषणे झालीत.
यावेळी प्रसिद्ध कवी रत्नाकर चटप यांच्या अध्यक्षतेखाली व कवी रमेश घुमे यांच्या संचालनात नवोदित कवींचे संमेलन झाले. त्यात ११ कवींनी कविता सादर केला. त्याचा आयोजकांकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रिपाइंचे तालुका अध्यक्ष अशोककुमार उमरे यांनी, संचालन शाहीर यशवंत गायकवाड यांनी आणि आभार प्रदर्शन गौतम भसारकर यांनी केले. कार्यक्रमासाठी रिपाइं (आ.) चे तालुका महासचिव प्रभाकर खाडे, राहुल उमरे, विक्की मूल, विठ्ठल पोतराजे, महिला ता. अध्यक्षा प्रिया खाडे, सरस्वती देवाळकर, मोहन सोनटक्के, रामचंद्र सोनटक्के, सुभाष शिरटकर, देवराव रंगारे, राजकुमार नरवाडे, गणपत चुनारकर, सुरेश उमरे, सोमाजी मुन, शाकेश उमरे, सूजर झाडे, बंडू मुन, शंकर पेगडपल्लीवार, समाधान सोनकांबळे, शैलेश चांदेकर आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)