शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

‘स्वारी’ लिहून परीक्षेच्या पूर्वसंध्येला ‘अनिशा’ची एक्झिट

By परिमल डोहणे | Updated: February 20, 2024 22:14 IST

सुमित्रानगर तुकुम येथील घटना

चंद्रपूर : नोटबुकाच्या शेवटच्या पानावर ‘स्वारी’ लिहून बारावीच्या विद्यार्थिनीने परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच आपल्या आजोबाच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.२०) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुमित्रानगर तुकुम येथे उघडकीस आली. अनिशा खरतड (१९) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अनिशाचे वडील चंद्रपूर पोलिस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

अनिशा आपल्या आई-वडील बहीण व भावासह जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होती तर लगतच तिचे आजी-आजोबा वास्तव्यास आहेत. सद्य:स्थितीत ते नागपूरला गेले आहेत. त्यामुळे त्याचा फ्लॅट रिकामा आहे. २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा असल्याने ती आजोबांच्या फ्लॅटमध्ये अभ्यास करायला जायची. अनिशा मागील वर्षीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. मात्र, गणितामध्ये अधिक गुण मिळावे यासाठी ती पुनर्परीक्षा देणार होती. मंगळवारी ती दररोजसारखी अभ्यास करायला आजोबांच्या फ्लॅटमध्ये गेली होती. मात्र, बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नाही. त्यामुळे तिचे आई-वडील त्याठिकाणी गेले. त्यांना दरवाजा उघडाच आला. त्यांनी रुममध्ये जाऊन बघितल्याबरोबर अनिशा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हे दृश्य बघून दोघांनीही मोठा हंबरडा फोडला. याबाबतची माहिती दुर्गापूर पोलिस स्टेशनला देण्यात आली.

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, दुर्गापूरच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे आपल्या चमूसह दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करताना नोटबुकच्या शेवटच्या पानावर ‘स्वारी’ लिहिल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी