माणिकगड पहाडावरील जनावरांना उपचार मिळेना
By Admin | Updated: November 15, 2014 01:32 IST2014-11-15T01:32:22+5:302014-11-15T01:32:22+5:30
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी जिवती येथे श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यात आली.

माणिकगड पहाडावरील जनावरांना उपचार मिळेना
जिवती : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी जिवती येथे श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या अनेक दिवसापासून येथील महिला पशुधन पर्यवेक्षीका हजर राहत नसल्याने उपचारासाठी जनावरे घेवून दवाखान्यात आलेल्या पशुपालकांना उपचाराविनाच परतावे लागत आहे.
चकरा मारुन मारून अनेकांची जनावरे दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तालुक्याचे ठिकाणी असलेया दवाखान्यात जनावरांच्या विविध आजारावर योग्य निदान होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र निदान तर सोडाच येथे डॉक्टरच राहत नसल्याची बोंब आहे. गावाची संख्या व तेथील पशुधनाची संख्या पाहता तालुक्याच्या ठिकाणी श्रेणी एकचे चिकित्सालय आवश्यक असून मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.
श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षीका महिला दिल्याने उलट त्रास वाढला. त्यांची आता बदली झाली असून अद्याप कोणताही डॉक्टर येथे रुजू झालेला नाही. दवाखान्या अंतर्गत येणारी गावे व त्यांच्यातील अंतर व रस्त्याची दयनीय अवस्था ही महिला पशुधन पर्यवेक्षीका उपचारासाठी पाऊले उचलली नसल्याचे कळते.
परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरे पाळली जातात. मात्र, जनावरांना विविध आजारांनी ग्रासले आहे. गावात उपचार मिळत नाही. मग जनावराला उपचारासाठी न्यायचे कुठे असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जनावरांना उपचार देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे याकडे लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)