कत्तलखान्यात जाणारी जनावरे पकडली

By Admin | Updated: September 5, 2015 01:05 IST2015-09-05T01:05:38+5:302015-09-05T01:05:38+5:30

जनावरांची विक्री करून कत्तलखान्यात नेत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली. या कारवाईत १० जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे.

Animals caught in slaughter houses | कत्तलखान्यात जाणारी जनावरे पकडली

कत्तलखान्यात जाणारी जनावरे पकडली

दोघांना अटक : १० जनावरे कोंडवाड्यात, मेंडकी पोलिसांची कारवाई
मेंडकी : जनावरांची विक्री करून कत्तलखान्यात नेत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली. या कारवाईत १० जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. ही कारवाई मेंडकी उपपोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी पहाटे केली.
नवेगाव (खुर्द) येथून पहाटेच्या सुमारास एम.एच. २७ एक्स ७६७९ या चारचाकी वाहनाने जनावरांना परप्रांतातील कत्तल खान्यात नेत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. मेंंडकी पोलिसांनी सापडा रचून वाहनाला अडविले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात १० जनावरे आढळून आलेत. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. चालक शमशेर जहरुद्दीन सैय्यद (२०) रा. पवनी व किल्नर शेख सुलतान अब्दुल हबीब शेख (२०) रा. भिवापूर जि. नागपूर या दोघांना अटक करून जनावरे व वाहन ताब्यात घेतले.
मेंडकी येथील उपपोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र एस. खैरकर पोलीस ताफ्यासह मेंडकी येथे गस्त घालीत असताना नवेगाववर (खुर्द) येथून चारचाकी वाहन जनावरांना घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खैरकर, पोलीस हवालदार युवराज जगताप, तानुजी रायपुरे, राजेंद्र जुमनाके यांनी मेंडकी येथील बस स्थानकावर सापडा रचून नाकेबंदी केली.
आरोपींकडून १० गायी व वाहन असे चार लाख १७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जनावरांना मेंडकी येथील कोंडवाड्यात टाकण्यात आले असून प्रकरणाचा तपास मेंडकी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Animals caught in slaughter houses