शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलिसाला चिरडलं; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 15:31 IST

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर खांबाडा चेकपोस्टवरी घटना

चंद्रपूर: जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलीस शिपायाला चिरडल्याची घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे तस्करांच्या वाढत्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यवतमाळहून नागपूरकडे जाणाऱ्या एका वाहनातून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा चेकपोस्टवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं. जनावरांची तस्करी करणारं वाहन रात्री अकराच्या सुमारास चेकपोस्टवर आलं. त्यावेळी पोलिसांनी वाहन थांबवण्यास सांगितलं. मात्र वाहन चालकानं वेग वाढवला आणि एका शिपायाला चिरडलं. यामध्ये शिपायाचा मृत्यू झाला. प्रकाश मेश्राम असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. दोनच महिन्यांपूर्वी चंद्रपूरात अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनानं पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना चिरडलं होतं. चिडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ते नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. छत्रपती चिडे मौशी चोरगावजवळ गस्तीवर असताना ही घटना घडली. अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिडे यांना उडवलं. त्यांना जखमी अवस्थेत ब्रम्हपुरीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस