बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:51+5:302021-01-13T05:11:51+5:30
चंद्रपूर : देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूने तोंड वर काढले आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ...

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग अलर्ट
चंद्रपूर : देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूने तोंड वर काढले आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून कावळे, वन्यप्राणी, स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्य शासनाने संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान, सध्यातरी जिल्ह्यात अशाप्रकारचा कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कुकुटपालकांनीही बर्ल्ड फ्लूचा शिरकाव होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरु केल्या आहे. दरम्यान, पुढील काळात संशयित क्षेत्रातून पक्ष्यांची वाहतूक होणार नाही यासाठीही नियोजन केले जात आहे. संसर्ग वाढल्यास काय उपाययोजना करायच्या यावरही पशुसंवर्धन विभागाने तयारी सुरु केली असून नागरिकांनी न घाबरता माल खावे. शिजविलेले मांस खाल्यामुळे कोणताही आजार होत नसल्याचेही पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
स्थलांतरित पक्षांच्या माध्यमातून बर्ड फ्लू पसरु नये यासाठी या पक्षांवर तसेच कावळे, वन्यप्राणी यांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एखाद्या भागात पक्षी मृत पावल्यास याबाबतची त्वरित माहिती विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निर्जंतुकीकरणावर विशेष लक्ष देण्यात येत असून कोणत्या उपाययोजना करायला हव्या यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावातील हालचालींवर नजर ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे.
---
मृत पक्षी आढळल्यास तात्काळ कळवा
बर्ड फ्लू हा आजार आहे. जिल्ह्यात कोणताही धोका नाही. खबरदारी म्हणून काळजी घेतली जात आहे. एखाद्या परिसरात पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाला कळविण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
कोट
जिल्ह्यात सध्या तरी बर्ड फ्लूचा काेणताही धोका नाही. संभाव्य धोका टाळण्यासाठी
पशुसंवर्धन विभागाने आवश्यक त्या उपाययोजन सुरु केल्या आहेत. कुकुटपालक व्यावसायिकांनी काळजी करू नये.
डाॅ. अविनाश सोमनाथे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर,