लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवाळीचे गिफ्ट न दिल्याच्या वादातून चंद्रपुरात सहा जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाचा अवघ्या तासभरात स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
नितेश वासुदेव ठाकरे, (२७) रा. वॉर्ड क्रमांक ०१, बेताल चौक दुर्गापूर असे मृतकाचे नाव आहे. तर करण गोपाल मेश्राम (२२), यश छोटेलाल राऊत (१९) अनिल रामेश्वर बोंडे (२२), प्रतीक माणिक मेश्राम (२२), तौसीफ अजीज शेख (२३), सुजित जयकुमार गणवीर (२५) सर्व रा. दुर्गापूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. दुर्गापूर येथे सुजित गणवीर याचा पानठेला आहे. त्याच्याकडे नितेश ठाकरे हा काही महिन्यांपासून काम करत होता. दिवाळी असल्याने नितेशने मालकाकडून नवीन कपडे किंवा गिफ्टची अपेक्षा होती. मात्र, सुजितने गिफ्ट दिले नाही. यामुळे नाराज होऊन नितेशने कामावर जाणे बंद केले होते.
ऑनलाइन बोलावला चाकू
वाद झाल्याने सुजितच्या मनात नितेशविरुद्ध राग होता. त्यासाठी ऑनलाइन चाकू मागवला. बुधवारी नितेशला "चित्रपट पाहायला जाऊ या" या बहाण्याने काही मित्रांसह बाहेर घेऊन गेला. यानंतर सर्वजण रात्री मद्यपान करून तुकूमकडील लॉ कॉलेजच्या मागील हुकूम परिसरात निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे आरोपींनी नितेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.
पुरावे नष्ट करण्यासाठी जाळली दुचाकी
नितेशच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी नितेशची दुचाकी पद्मापूर परिसरातील नीला पाणी नाल्याजवळ नेऊन पेटवून दिली.मात्र, गुरुवारी सकाळी लॉ कॉलेज परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती पसरली. दरम्यान, मृतदेह नितेशचा असल्याचे स्पष्ट झाले.ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगरचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात केली
Web Summary : A Chandrapur youth was murdered by six people over a Diwali gift dispute. The accused lured him out under the pretext of watching a movie, then killed him. Police arrested all six perpetrators swiftly. The victim's motorcycle was burned to destroy evidence.
Web Summary : चंद्रपुर में दिवाली के उपहार विवाद में छह लोगों ने एक युवक की हत्या कर दी। आरोपियों ने उसे फिल्म देखने के बहाने बाहर बुलाया, फिर उसकी हत्या कर दी। पुलिस ने सभी छह अपराधियों को तुरंत गिरफ्तार कर लिया। सबूत नष्ट करने के लिए पीड़ित की मोटरसाइकिल जला दी गई।