मोबाईल रसवंत्या भागवितात अंगाची काहिली
By Admin | Updated: May 11, 2015 01:09 IST2015-05-11T01:09:10+5:302015-05-11T01:09:10+5:30
रस्यावरून फिरणाऱ्या मोबाईल रसवंत्या नागरिकांचे आकर्षण बनल्या आहेत. या मोबाईल रसवंत्या रखरखत्या उन्हात अनेकाच्या अंगाची काहिली भागवीत आहेत.

मोबाईल रसवंत्या भागवितात अंगाची काहिली
नागभीड : रस्यावरून फिरणाऱ्या मोबाईल रसवंत्या नागरिकांचे आकर्षण बनल्या आहेत. या मोबाईल रसवंत्या रखरखत्या उन्हात अनेकाच्या अंगाची काहिली भागवीत आहेत.
उन्हाचा पारा सारखा चढत आहे. उन्हाने अंगाची लाही लाही होत असून यावर उपाय म्हणून प्रत्येक जण शितपेयांच्या दुकानात जाऊन आपल्या आवडीप्रमाणे आपली तृष्णातृप्ती करीत असते. पण शितपेयांच्या दुकानात जावून तृष्णा तृप्ती करणे प्रत्येकाच्याच आवाक्यात असते, असे नाही किंवा अशा दुकानांमध्ये जाऊन बसणे हे आजही कित्येक महिलांच्या संस्कृतीत बसत नाही. या साऱ्या बाबी लक्षात घेवून काही बेरोजगार तरुणांनी मोबाईल रसवंतीची पद्धत अंमलात आणली आही. हा व्यवसाय उत्तम असून सकाळी १० वाजेपासून त्यांची सुरू झालेली दिनचर्या रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत सुरू असते. या कालावधीत मोबाईल रसवंत्या शहरातील प्रत्येक रस्त्याने फिरत असतात.
मोबाईल रसवंती आपल्या गल्लीत आली की, लोकांना याची माहिती व्हावी यासाठी घुंगरांचा विशिष्ट आवाज रसवंतीवाल्याकडून करण्यात येतो. हा आवाज आला की घराघरातून मुले, महिला रस्त्यावर येवून कुल्फी, आईस गोळा, उसाचा रस घेवून आपली इच्छापूर्ती करताना दिसतात. (तालुका प्रतिनिधी)