अज्ञाताने आरओ मशीनवर काढला राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST2021-09-17T04:33:47+5:302021-09-17T04:33:47+5:30

घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील मौजा - दिघोरी येथील पाण्याच्या आरओ मशीनची अज्ञात माथेफिरुने दगडाने तोडफोड केली. दोषीवर ...

Anger unleashed on RO machine | अज्ञाताने आरओ मशीनवर काढला राग

अज्ञाताने आरओ मशीनवर काढला राग

घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील मौजा - दिघोरी येथील पाण्याच्या आरओ मशीनची अज्ञात माथेफिरुने दगडाने तोडफोड केली. दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दिघोरी ग्रामपंचायतीने १४ सप्टेंबरला ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभेत तंटामुक्त समिती तसेच पाणी पुरवठा समिती गठीत करण्यात आली होती. त्याच रात्री अज्ञात इसमाने शुध्द पाण्याच्या आरओ मशीनची दगडाने तोडफोड केली. परिणामी काचा तुटल्याने आतमध्ये सहज शिरकाव करता येतो.

शुध्द पाण्याच्या आरओ मशीनची तोडफोड करण्यामागे केवळ राग असेल तर एकवेळ समजून घेतले जाईल. मात्र, हेतू धोकादायक असल्यास भविष्यात गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरओचालक अमित निमसरकार यांनी तंटामुक्त समिती व बेंबाळ चौकीत याबाबत तक्रार दाखल केली असून, पोलीस काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

160921\1641-img-20210916-wa0019.jpg

दिघोरीतील शुद्ध पाण्याच्या आर. ओ. ची दगडाने तोडफोड

Web Title: Anger unleashed on RO machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.