अंगणवाडी कर्मचाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे धडक
By Admin | Updated: December 23, 2016 00:47 IST2016-12-23T00:47:45+5:302016-12-23T00:47:45+5:30
अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडे धडक
चंद्रपूर : अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी किमान वेतन देण्याची मागणी करण्यात आली.
अ.भा. अंगणवाडी फेडरेशनच्या निर्णयानुसार खासदारांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना पाठविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना विश्रामगृहावर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रास्ताविक प्रा. दहिवडे यांनी केले.
ना. अहीर यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. अंगणवाडी महिलांना किमान वेतन १८ हजार रुपये लागू करा, ४४ व्या श्रम संमेलनाच्या शिफारशीची अंमलबजावणी करून अंगणवाडी महिलांना सामाजिक सुरक्षा तसेच पेंशन देण्यात यावे, महागाई भत्ता लागू करण्यात यावा आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. ना. अहिर म्हणाले की, अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांबाबत मला सहानुभूती आहे. सहा वर्षाचे कार्यकाळात केंद्र शासनाचे वतीने वाढ करण्यात आली नाही. ही एक चिंतेची बाब आहे. तुमचे रास्त प्रश्न आणि न्याय मागण्या मार्गी लावण्याचे दृष्टीने मी पुर्णत: प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी अंगणवाडी महिलांना दिले.
पवित्रा ताकसांडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शोभा बोगावार, रेखा ढेंगळे, शारदा लेनगुरे, गुजाबाई डोंगे, संगीता देशमुख, मंजुषा ठाकरे, रत्नमाला वाघमारे, विजया महावादीवार, वर्षा बल्की, विमल जेनेकर, आशा नाखले, राधा सुंकरवार यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)