अंगणवाडी महिलांचा मेळावा
By Admin | Updated: May 18, 2015 01:27 IST2015-05-18T01:27:26+5:302015-05-18T01:27:26+5:30
अंगणवाडी महिलांचा मेळावा छाया ढबकस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.

अंगणवाडी महिलांचा मेळावा
भद्रावती : अंगणवाडी महिलांचा मेळावा छाया ढबकस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात सीमा रोडे म्हणाल्या, अल्पशा मानधनवर काम करणाऱ्या अंगणवाडी महिलांना गेल्या चार महिन्यांपासून केंद्र तथा राज्याचे मानधन मिळाले नाही. काम करूनदेखील कसे जगावे, असा प्रश्न अंगणवाडी महिलापुढे निर्माण झाला आहे. प्रा. दहीवडे म्हणाले, १ एप्रिल २०१५ पासून मानधन वाढ देण्याचा निर्णय भाजपा शासनाने घेतला. काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढ लागू करण्यात यावी, या मागणीला घेऊन २५ एप्रिलला आझाद मैदान येथे विशाल मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटले. आठ दिवसात बैठक बोलावून घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल, असे आश्वासन अंगणवाडी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार ८ एप्रिलला बैठक बोलविण्यात आली. परंतु बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाही. त्यामुळे हा प्रश्न असाच रेंगाळला. आभार प्रतिभा जांभूळकर यांनी मानले. (प्रतिनिधी)