अंगणवाडी महिला रस्त्यावर उतरणार

By Admin | Updated: August 9, 2015 01:12 IST2015-08-09T01:12:39+5:302015-08-09T01:12:39+5:30

दीर्घकाळ लढा करुन अंगणवाडी महिलांनी मानधन वाढ, तसेच सेवानिवृत्तीचा लाभ मिळविला.

Anganwadi women will go on the streets | अंगणवाडी महिला रस्त्यावर उतरणार

अंगणवाडी महिला रस्त्यावर उतरणार

वाढीव मानधनसाठी लढा सुरूच : रमेशचंद्र दहिवडे यांनी केली घोषणा
चंद्रपूर : दीर्घकाळ लढा करुन अंगणवाडी महिलांनी मानधन वाढ, तसेच सेवानिवृत्तीचा लाभ मिळविला. मात्र घोषित केलेली मानधन वाढ १ एप्रिल २०१४ पासून देण्यात आली नाही. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना तसेच मदतनिसांना सेवानिवृत्तीचा लाभ वर्ष लोटूनही कोणालाही मिळाले नाही. २० वर्षांपासून मिळणारी दिवाळी भेट देखील दिल्या गेली नाही. याचा जाब अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यासाठी १५ आॅगस्टला अंगणवाडी महिलांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन प्रा. दहिवडे यांनी बुधवारी येथे केले.
दयावती गोटे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात संध्या खनके म्हणाल्या, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली या देशातील सर्व सामान्य जनता मोहात पडली. इच्छा नसतानाही आम्ही यांना निवडून दिले. आता आपण त्यांंना ‘बुरे दिन’ दाखविल्याशिवाय आपले ‘अच्छे दिन’ येणार नाही. त्याची पुर्व तयारी म्हणून १५ आॅगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत गांधी चौक चंद्रपूर येथे एकत्र यावे, असे आवाहन संध्या खनके यांनी केले. सुचिता सोनटक्के यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्याकरीता सुरेखा निंबाळकर, दिप्ती भगत, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Anganwadi women will go on the streets