...आणि नवरदेव पोहचलाच नाही
By Admin | Updated: March 13, 2015 01:38 IST2015-03-13T01:38:49+5:302015-03-13T01:38:49+5:30
जन्मोजन्मी सोबत राहण्याची त्यांनी शपथ घेतही. एकत्र राहून संसार थाटण्याचे स्वप्नही रंगविले. मात्र काही दिवसातच प्रेमविराने ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेऊन आपल्या प्रेयसिला फसविले.

...आणि नवरदेव पोहचलाच नाही
ब्रह्मपुरी : जन्मोजन्मी सोबत राहण्याची त्यांनी शपथ घेतही. एकत्र राहून संसार थाटण्याचे स्वप्नही रंगविले. मात्र काही दिवसातच प्रेमविराने ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेऊन आपल्या प्रेयसिला फसविले. यानंतर तिने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसी खाक्यानंतर तो लग्नास तयार झाला. मात्र मंडपात पोहचलाच नाही. त्यामुळे वधुकडील मंडळींनी पुन्हा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. ही घटना ब्रह्मपुरी येथे घडली.
चंद्रपूर येथील प्रदीप भगवान मेश्राम (२८) याने ब्रह्मपुरी येथे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले. या केंद्रात दिव्या (काल्पनीक नाव) प्रशिक्षण घेण्यासाठी जायची. प्रशिक्षण सुरु असतानाच त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु झाले. प्रेमामध्ये आणाभाका घेतल्या. एकत्र राहण्याची शपथ घेतली. दरम्यान प्रदिपला नोकरी लागल्याने तो मुळगावी परतला. त्यानंतर दिल्याने लग्न करण्याची गळ घातली. मात्र ‘तो मी नव्हेच’ ची भूमिका प्रदिपने घेतली. त्यानंतर आई-वडील आणि सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांना समज देवून लग्न जुळवून आणले. यासाठी वेळ, तारीखही ठरविण्यात आली. ठरल्यानुसार दिव्याच्या कुटुंबियांनी लग्नाची पूर्ण तयारी केली. नातेवाईकांनाही बोलावले. लग्नाची वेळ आली, सारे वऱ्हाडी नवरदेवाची वाट बघू लागले. मात्र प्रदिप आलाच नाही. त्यामुळे वधुकडच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रदीप गेडामवर गुन्हा नोंदविला.