आणि मन्या मेंबर झाला !

By Admin | Updated: August 10, 2015 00:43 IST2015-08-10T00:43:51+5:302015-08-10T00:43:51+5:30

मतदारांचा कल केव्हा कोणाच्या बाजुने झुकेल याचा काहीच भरवसा नसतो. नागभीडच्या वॉर्ड नं. १ मध्ये तेच झाले.

And the carcass has grown! | आणि मन्या मेंबर झाला !

आणि मन्या मेंबर झाला !

नागभीड : मतदारांचा कल केव्हा कोणाच्या बाजुने झुकेल याचा काहीच भरवसा नसतो. नागभीडच्या वॉर्ड नं. १ मध्ये तेच झाले. निवडणुकीच्या आदल्या दिवशीपर्यंत कोणत्याही खिजगिणतीत नसलेला मन्या ढोकच्या बाबतीत एका रात्रीत आश्चर्य घडले आणि तो नागभीडचा मेंबर झाला.
मन्या ढोक ! एक सामान्य माणूस. सांगेल त्याचे काम ऐकणारा. अशीच त्याची नागभीडभर ख्याती. या अगोदरही त्याने दोनदा नागभीड ग्रामपंचायतीसाठी नशिब अजमावले. पण बलाढ्य उमेदवारांसमोर त्याचा टिकाव लागला नाही. पण मन्याने आपले व्रत सोडले नाही. त्याच चिकाटीने तो लोकांच्या संपर्कात राहीला. पण जशी अगोदर त्याच्या नावाची चर्चा व्हायची, तशी चर्चा आता कोणी करीत नव्हते.
अशातच यावेळची ग्रामपंचायतीची निवडणूक आली. दोन्ही पक्षांच्या बलाढ्य उमेदवारांनी दंड थोपटायला सुरूवात केली. या थोपटाथोपटीत मन्याचे नाव कोणीच घेत नव्हते. मन्यानेही पुर्वानुभव लक्षात घेवून या फंदात पाडायचे नाही, असे ठरवले आणि त्याचवेळी कोणाला तरी लक्षात आले की, समोरच्या उमेदवाराची मते कमी करावयाची असतील तर मन्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. झाले मन्याला लगेच तयार करण्यात आले. मन्याही तयार झाला आणि मन्याचे नामांकन भरण्यात आले. प्रचार सुरू झाला. दिग्गज उमेदवार त्यांच्या पद्धतीने प्रचार करू लागले. मन्याकडे पैसाही नाही अन् कार्यकर्तेही नाही. ‘एकला चलो रे’ अशी भूमिका मन्याने सुरू केली. घरोघरी जाऊन मतदारांना नमस्कार करणे हेच मन्याचे काम. निवडणुकीच्या पुर्वसंध्येपर्यंत मन्या फार तर १० ते २० मते घेईल, असाच अनेकांचा अंदाज. पण वॉर्डात ‘पब्लिक’ होती. ही ‘पब्लिक’ कोण काय करते याचेही निरिक्षण करीत होती. आणि याच पब्लिकने चमत्कार केला. इव्हीएम मशीनच्या माध्यमातून या पब्लीकने मन्याला एवढी मदत केली की, मन्याला नागभीडचा मेंबर करून दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: And the carcass has grown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.