आनंदवन कधीही संपावर गेले नाही; जाणारही नाही

By Admin | Updated: July 10, 2017 00:22 IST2017-07-10T00:22:51+5:302017-07-10T00:22:51+5:30

वृक्षाची सावली, माऊलीची माया आणि गुरूचे ज्ञान यांचे मोठे महत्त्व आहे. आई कधीही संपावर जात नाही म्हणून आनंदवनही कधी संपावर गेले नाही आणि जाणारही नाही.

Anandvan never went on strike; Not going to happen | आनंदवन कधीही संपावर गेले नाही; जाणारही नाही

आनंदवन कधीही संपावर गेले नाही; जाणारही नाही

डॉ. विकास आमटे : वृक्षदिंडीने लक्ष वेधले
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वृक्षाची सावली, माऊलीची माया आणि गुरूचे ज्ञान यांचे मोठे महत्त्व आहे. आई कधीही संपावर जात नाही म्हणून आनंदवनही कधी संपावर गेले नाही आणि जाणारही नाही. असेच व दिशादर्शक कार्य आजवर साधनाताईंंनी केले होते, असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनात साधाताई आमटे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त केले.
साधनाताई आमटे यांचा सहाव्या स्मृती दिनानिमित्त आनंदवनात वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. बाबा व साधनाताई यांच्या समाधीला आणि अनाम कळ्यांची व वृक्षांची स्मरणशक्तीला येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. पर्यावरण संवर्धन हा विषय घेवून सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभुषा साकारून वृक्षदिंडीला सुरूवात केली. यामध्ये भजन मंडळ सहभागी झाले होते. आनंदवन चौकातून निघालेली वृक्षदिंडी समाधीपर्यंत काढण्यात आली. वृक्षदिंडीमध्ये डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, पल्लवी आमटे, गौतम करजगी, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू, माधव कवीश्वर, प्राचार्य सुहास पोतदार, प्राचार्य डॉ. मृणाल काळे, आनंदवनचे सरपंच काशीनाथ मेश्राम उपस्थित होते. साधना मुरलीधर वनश्री या नावाने मियापाकी या जापनीज पध्दतीने कमी जागेत जास्त झाडे या रचनेप्रमाणे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, आनंदवन मित्र मंडळाचे प्रवीण मुधोळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचिताचे कवडसे या लेखाचे वाचन करण्यात आले. आनंद मूकबधीर, आनंद अंध, आनंदवन जि.प. उच्च प्राथमिक शाळा, संधी निकेतन, आनंदवन शेळकी, आनंदवन कृषी महाविद्यालय, आनंद निकेतन महाविद्यालय व आनंदवनातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. लता मंगेशकर दंत महाविद्यालय नागपूरच्या चमुने मोफत दंत चिकित्सा शिबिर घेतले. समारोप श्रद्धावन येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रवी नलगंटीवार यांनी केले.

Web Title: Anandvan never went on strike; Not going to happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.