खुनशी हल्लाप्रकरणी दंडाची रक्कम जखमीला
By Admin | Updated: August 12, 2016 01:08 IST2016-08-12T01:08:32+5:302016-08-12T01:08:32+5:30
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर चाकूहल्ला करून जखमी करण्यात आले.

खुनशी हल्लाप्रकरणी दंडाची रक्कम जखमीला
दारू पिण्यास पैसे न दिल्याने चाकूने वार
चंद्रपूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर चाकूहल्ला करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के. एल. व्यास यांनी शिक्षा म्हणून आरोपीला ११ हजार रुपये दंड करून ती रक्कम चाकू हल्ल्यात जखमी व्यक्तीला देण्याचा आदेश दिला आहे.
आरोपी प्रदीप दिनानाथ प्रसाद (२८) रा. राष्ट्रवादी नगर, चंद्रपूर व वैकुंठनाथ दिनबंधू औसा (४८) रा. ताडाळी, चंद्रपूर हे एकमेकांचे मित्र असून ते दारू पिण्याकरिता गेले होते. दारू पिऊन परत आणखी दारू पिण्याकरिता आरोपीने जखमी जमाल कुरेशी यांना पैसे मागितले. त्यावर कुरेशी यांनी पैसे दिले नाही. त्यामुळे आरोपी प्रदीप प्रसाद याने कुरेशी यांच्या छातीवर चाकूने वार करून जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामोड यांनी केला.
न्यायालयाने आरोपी प्रदीप प्रसाद याला ११ हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सात महिने सक्तमजुरीची शिक्षा तसेच दंडाची रक्कम जकमी शेख जमील कुरेशी यांना देण्यात यावी, असा आदेश न्या. के.एल. व्यास यांनी दिला आहे. सदर प्रकरणामध्ये सरकारतर्फे अॅड. देवेंद्र महाजन यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)