अंबुजा शाळेने शिक्षण शुल्कात सूट द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:20+5:302021-04-23T04:30:20+5:30
आवाळपूर : कोरोनामुळे शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये शाळा भरल्याच नाही. लॉकडाऊनमुळे लोकांच्या हातचा रोजगार चालला गेल्याने अनेकांना संसार चालविणे ...

अंबुजा शाळेने शिक्षण शुल्कात सूट द्यावी
आवाळपूर : कोरोनामुळे शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये शाळा भरल्याच नाही. लॉकडाऊनमुळे लोकांच्या हातचा रोजगार चालला गेल्याने अनेकांना संसार चालविणे कठीण झाले आहे. कोविडचे सावट सुरू असताना शिक्षण घेणारी मुले ही नाइलाजाने
एकही दिवस शाळेत जात नाही. पर्यायाने त्यांचे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अध्यापन होत आहे. अशा स्थितीत पालकांना वारंवार शिक्षण शुल्क व ई लर्निंग शुल्क भरण्याचा तगादा शाळेतून लावला जात आहे. हा पालकांवर होणारा अन्याय आहे.
कोविडमुळे सर्वसामान्य पालक व इतरांनाही पूर्ण फी भरणे अवघड झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता चंद्रपूर येथील कारमेल अकॅडमी या शाळेने विद्यार्थांचे शैक्षणिक शुल्क हे ३५ टक्के तर राजुरा येथील स्टेला मॉरिस या शाळेने २५ टक्के शैक्षणिक शुल्क कमी केलेले आहे. तसेच याच परिसरातील माणिकगड शाळा गडचांदूर या शाळेने शिक्षण शुल्कात २५ टक्केपर्यंत सूट दिलेली आहे.
तशीच सूट अंबुजा विद्या निकेतन उपरवाही शाळेने द्यावी आणि ज्यांनी शाळेच्या दबावाखाली येऊन फी भरली असेल त्यांची पुढील शैक्षणिक सत्रात सदर फी समायोजित करावी, अशी मागणी पालकांनी आ. सुभाष धोटे व मराठा सिमेंट वर्क्स उपरवाहीचे युनिट हेड व प्राचार्य अंबुजा विद्या निकेतन यांना ई-मेलद्वारे केली आहे.