आंबेडकर भवनप्रकरणी कोठारीत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 01:15 IST2016-07-09T01:15:53+5:302016-07-09T01:15:53+5:30
मुंबई येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस जमीनदोस्त करणाऱ्या सर्व आरोपींवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी,....

आंबेडकर भवनप्रकरणी कोठारीत मोर्चा
कोठारी : मुंबई येथील आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस जमीनदोस्त करणाऱ्या सर्व आरोपींवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी कोठारीत मोर्चा काढण्यात आला व कडकडीत बंद पाळण्यात आला. बल्लारपूर नायब तहसीलदार वाडीघरे व ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चादरम्यान येथील पोलीस स्टेशनसमोर एक निषेध सभा झाली. त्यात धीरज बांबोडे, वेणुदास खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन, आभार अनिल वनकर यांनी केले. मोर्चामध्ये राजकुमार पेटकर, भारिप बमसं जिल्हा युवक आघाडी महासचिव धीरज बांबोडे, बाबुराव खोब्रागडे, शुभम खोब्रागडे, नंदू जीवने, प्रमोद खोब्रागडे, उपसरपंच अमोल कातकर, रमेश पेरगुलवार, शोभा खोब्रागडे, सरस्वती खोब्रागडे, राहुल रामटेके, अनिल वनकर, आकाश रायपुरे, सिद्धार्थ शंभरकर आदीसह समस्त बौद्ध समाज मोर्चात सहभागी झाले. (वार्ताहर)