नवोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:54+5:302021-02-05T07:37:54+5:30
या मेळाव्यास १९९४ पासून आजपर्यंत शिक्षण घेतलेले व विविध क्षेत्रात नोकरी तसेच व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळविलेले, उच्च शिक्षण ...

नवोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा
या मेळाव्यास १९९४ पासून आजपर्यंत शिक्षण घेतलेले व विविध क्षेत्रात नोकरी तसेच व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळविलेले, उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी उपस्थित होते.
या सोहळ्याला नवोदय विद्यालयाचे प्रथम व माजी प्राचार्य रवींद्र रमतकर उपस्थित होते. या स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या क्षेत्रात मिळालेले आपले अनुभव एकमेकांशी विचारविनिमय करून शेअर केले. तसेच विद्यालयाचे कर्मचारी व शिक्षकवृंदाविषयी आदर व्यक्त करीत कृतज्ञता व्यक्त केली. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत २०१६ मध्ये स्थापन केलेल्या बहूद्देशीय संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला. व कोरोनाच्या काळात संस्थेने गरजू विद्यार्थ्यांना तसेच कुटुंबाना कशाप्रकारे मदत केली, याची माहिती यावेळी देण्यात आली. संस्थाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी पुढील वर्षी संस्थेची नियोजित कार्यक्रमावली सादर केली.