शिक्षकांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाची परतफेड म्हणून माजी विद्यार्थ्यांनी हा सत्कार केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नंदा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तोहीत शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य उर्मिला मडावी, मुख्याध्यापक मेंडुले, विषयतज्ज्ञ विकास भंडारवार, शिक्षक गुप्ता माजी प्राचार्य गिरिधर बोबडे आदी उपस्थित होते. यावेळी शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी पुरुषोत्तम निब्रड, संदीप खिरटकर, भास्कर गोंडे, राम रोगे, दादाजी कामटकर, हारुण सिद्धिकी, उमेश पोहाणे, चंद्रशेखर राऊत, प्रकाश राऊत, सुभाष खोके, प्रशांत नवले, पोहनकर, परचाके आदी उपस्थित होते. शाळेला १५० प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, पुढेही शाळेच्या नावलौकिक उत्तम दर्जा व विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी शिक्षक गुप्ता यांनी सांगितले.
माजी विद्यार्थ्यांनी केला शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST