ऐन रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला पर्यायी जागा उपलब्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:07+5:302021-07-22T04:18:07+5:30

लोकमत इम्पॅक्ट बल्लारपूर : येथील नगरपालिका ते गोलपुलिया या दुपदरी मार्गावर रोज भरत असलेल्या बाजारामुळे ‘दुपदरी मार्ग झाला एकेरी’ ...

Alternative space available for vegetable market on Ain Road! | ऐन रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला पर्यायी जागा उपलब्ध!

ऐन रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला पर्यायी जागा उपलब्ध!

लोकमत इम्पॅक्ट

बल्लारपूर : येथील नगरपालिका ते गोलपुलिया या दुपदरी मार्गावर रोज भरत असलेल्या बाजारामुळे ‘दुपदरी मार्ग झाला एकेरी’ या मथळ्याखाली ही जनसामान्यांची समस्या ‘लोकमत’ने बुधवारी बातमीच्या माध्यमातून प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित होताच प्रशासन जागे झाले. तत्काळ त्यांनी कार्यवाही करत भर रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला पर्यायी जागा देऊन हा दुपदरी मार्ग मोकळा केला आहे.

नगरपालिका ते गोलपुलिया हा दुपदरी रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. वेकोलिमुळे जड वाहनांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. भररस्त्यावर रोज भरणाऱ्या बाजारामुळे या मार्गावरील वाहतूक एकतर्फी करण्यात आली होती. ‘लोकमत’ने जनसामान्यांची ही समस्या प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत प्रशासनाने भाजीबाजाराला तत्काळ पर्यायी जागेची व्यवस्था करून दिली असून, हा मार्ग आता परत दुपदरी वाहतूक करता मोकळा झाला आहे.

Web Title: Alternative space available for vegetable market on Ain Road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.