मूल्यधिष्ठित शिक्षणासाेबत याेगाही महत्त्वाचे: वसंत टोंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:29+5:302021-03-25T04:26:29+5:30

विसापूर : तंत्रज्ञानाच्या युगात धावपळीमुळे माणसाची दगदग वाढली. त्यामुळे जीवनात एकटेपणा आला आहे. परिणामी आध्यात्मिक शिक्षणात खंड पडल्याचे दिसून ...

Along with value-based education, it is also important: Vasant Tonge | मूल्यधिष्ठित शिक्षणासाेबत याेगाही महत्त्वाचे: वसंत टोंगे

मूल्यधिष्ठित शिक्षणासाेबत याेगाही महत्त्वाचे: वसंत टोंगे

विसापूर : तंत्रज्ञानाच्या युगात धावपळीमुळे माणसाची दगदग वाढली. त्यामुळे जीवनात एकटेपणा आला आहे. परिणामी आध्यात्मिक शिक्षणात खंड पडल्याचे दिसून येत आहे. याला अपवाद मूल्यधिष्ठित शिक्षणदेखील नाही. समाज जीवनातील ही पाेकळी भरून काढण्यासाठी आत्म - गीत गुंजन काव्यसंग्रहाचा प्रपंच केला आहे. यामुळे आध्यात्मिक व मूल्याधिष्ठित शिक्षणासाेबत याेगाही महत्त्वाचे आहे, असे मत मुनीराज वसंतराव टाेंगे यांनी विसापूर येथे व्यक्त केले.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील स्थानिक मुनी समाज याेग संस्थेच्या वतीने स्थानिक सभागृहात आत्म - गीत गुंजन काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विसापूर येथील स्थानिक मुनी समाज याेग संस्थेचे अध्यक्ष शालिकराव भाेजेकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मुनीराज वसंतराव टाेंगे, डॉ विजय वर्हाटे, ॲड मुरलीधर देवाळकर, दिनकर डाेहे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय टाेंगे, नंदा टाेंगे, सुरेश पंदीलवार, संदीप गाैरकार, मधुकर परसूटकर, आर. एम सुंदरगिरी यांची उपस्थिती हाेती.

यावेळी मुनीराज शिवकुमार शास्त्री व याेगाचार्य राजेश्वर टाेंगे यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करून आत्म - गीत गुंजन काव्यसंग्रहाचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदा टाेंगे यांनी आत्म- गीत गुंजन काव्य संग्रहातील निवडक काव्याचे वाचन करून आध्यात्मिकता साेबतच याेगाचे महत्त्व विशद केले. संचालन संदीप गाैरकार तर आभार सुरेश पंदिलवार यांनी मानले.

Web Title: Along with value-based education, it is also important: Vasant Tonge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.