शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

झाडीपट्टीतील रानात फुलले बहुगुणी औषध वनस्पती कोरफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 6:00 AM

खडसंगी जवळील बरडघात गावातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी रानबोडी येथील तीन एकर जमिनीत धनंजयने चवदा महिन्यांपूर्वी कोरफड रोपांची लागवड केली. जमीन हलकी, मध्यम अथवा काळी असली तरी चालते. मात्र, पाण्याचा निचरा होणारी असणे आवश्यक आहे. अन्यथा पाणथळ जमिनीत याची लावण केली तर मुळे कुजून रोपांचे नुकसान तर होतेच, कोरफडही जळून जाते.

ठळक मुद्देसंडे अ‍ॅन्कर । खडसंगीतील एका युवा शेतकऱ्याचा प्रयोग, इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : सौंदर्य जोपासण्यासाठी आणि आहे ते तारुण्य चिरकाल अबाधित राहावे, ही नैसर्गिक इच्छा प्रत्येकाची असते. मात्र, ही इच्छा फलद्रूप होण्यासाठी शरीर चिरतरुण आणि महागडा औषधोपचार टाळण्यासाठी आयुर्वेदाने कोरफडीचा उपयोग नामी मानला आहे. शरीराअंतर्गत हालचालीवर नियंत्रण ठेवण्याबरोबर आधुनिक जीवनशैलीशी निगडित उपचारपद्धती ही आजकालची फॅशन ठरू लागली आहे. याच आधुनिक जगासाठी चंद्रपूर जिल्ह्यतील चिमूर सारख्या दुष्काळी तालुक्यातील खडसंगी येथील एका युवकाने पारंपरिक शेतीला फाटा देऊन तीन एकर शेतीमध्ये नवीन प्रयोग म्हणून कोरफड लागवड करून झाडीपट्टीत कोरपड फुलविली आहे.चिमूर तालुक्यातील खडसंगीचे धनंजय औतकर या २८ वर्षीय युवकांनी बीएस्सी कॉम्प्युटर मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेऊन काही काळ नागपुरात एका कंपनीत नोकरी केली. मात्र मनात वेगळं करण्याची जिद्द असल्याने धनंजयने जयपूर येथे ऑरगॅनिक शेतीचे प्रशिक्षण करून वर्धा येथे ऑरगॅनिक खताचेही प्रशिक्षण घेतले व शहरातील जीवनापेक्षा गावाकडील जीवनात रमण्याच्या उद्देशाने खडसंगी येथे राहून वडिलोपार्जित पारंपारिक शेतीला फाटा देत नाविन्यपूर्ण शेती करून इतर शेतकºयापुढे आदर्श निर्माण करण्याच्या प्रयत्न केला आहे.खडसंगी जवळील बरडघात गावातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी रानबोडी येथील तीन एकर जमिनीत धनंजयने चवदा महिन्यांपूर्वी कोरफड रोपांची लागवड केली. जमीन हलकी, मध्यम अथवा काळी असली तरी चालते. मात्र, पाण्याचा निचरा होणारी असणे आवश्यक आहे. अन्यथा पाणथळ जमिनीत याची लावण केली तर मुळे कुजून रोपांचे नुकसान तर होतेच, कोरफडही जळून जाते.एका रोपाला हलक्या जमिनीत दर आठ दिवसांनी, मध्यम जमिनीत दहा १० तर भारी जमिनीसाठी १५ दिवसांनी दोन ते तीन लिटर पाणी पुरेसे ठरते. पावसाने दगा दिला अथवा पाण्याची सुविधा जर या वेळेत उपलब्ध झाली नाही तर रोप वाळण्याची अजिबात भीती नाही.वार्षिक तीन ते चार लाख उत्पादनकोरफडीचे एक रोप पाच वर्षापर्यंत उत्पन्न देत राहते. एका झाडापासून सहा ते सात किलो गर निघतो दर सहा महिन्याने या झाडाच्या पानांची व गराची विक्री करता येते. हेक्टरी ५० ते ६० टन उत्पादन होणार आहे. यातून वार्षिक साधारण तीन ते चार लाख उत्पन्न होते, असे धनंजय औतकर यांनी लोकमतला सांगितले.कमी पाण्यावर होते शेतीया पिकासाठी सिंचनव्यवस्था पाटपाणी, ठिबक याद्वारे करण्यात आली असून दोन तीन महिन्यात पाणी दिले जाते. याचे प्रमाणही कमी असल्याने उपलब्ध पाण्यात तीन एकर कोरफड शक्य ठरली आहे. आंतरमशागत करता येत नसल्याने नांगरणी आणि सेंद्रिय खत, शेणखत याचाच प्रामुख्याने वापर केला तरच कोरफडीपासून औषधी गुणधर्म चांगल्या पद्धतीने मिळतात.कोरपड आहे बहुगुणी औषधकोरफडीचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधनासाठी केला जात असला तरी शरिराला लागणारी वेगवेगळे आम्ले, खनिजे याची मात्रा कोरफडीमध्ये असते. त्यामुळे कोरफडीपासून तयार करण्यात येत असलेल्या पदार्थाच्या नित्य सेवनाने शरिरातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम होते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण १२५ हून कमी झाले तर वाढविण्याचे आणि अतिरिक्त साखर झाली तर कमी करण्याचे काम होते. तसेच उंचीनुसार आवश्यक तेवढेच वजन ठेवण्याचे कामही केले जाते. याचबरोबर शरीरातील विषारी पदार्थाबरोबरच मृत पेशी बाहेर काढून नवीन पेशीनिर्मितीचे कामही केले जाते. त्यामुळे कोरपड हे बहुगुणी वनस्पती औषध आहे

टॅग्स :agricultureशेतीmedicineऔषधं