शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना सव्वादोन कोटी रुपयांचा भत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:32 IST

Gadchiroli : मतमोजणीनंतर तीन दिवसांत रक्कम खात्यात सुरक्षा दलाची शेवटची तुकडीही परतली, सर्व जवान स्वजिल्ह्यात सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत नक्षल प्रभावित व अतिदुर्गम गडचिरोली कर्तव्य बजावणाऱ्या १६ हजार जवानांना मतमोजणी प्रक्रियेनंतर तिसऱ्याच दिवशी भत्त्याची रक्कम अदा करण्यात आली. एवढ्या जलदगतीने भत्ता देणारा गडचिरोली एकमेव जिल्हा ठरला आहे. सुरक्षा जवानांच्या भत्त्यापोटी प्रशासनाला सुमारे सव्वादोन कोटी रुपये मोजावे लागले. 

ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या १११ कंपन्या तसेच नागपूर शहर, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षण सुरु असलेले नाशिक व पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर अशा विविध ठिकाणांहून एकूण ५०० पोलिस उपनिरीक्षक व अंमलदार तसेच स्थानिक ७०० च्या वर गृहरक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकूण १६,००० च्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुर्गम, अतिदुर्गम भागात मतदानानंतर टप्प्याटप्याने सुरक्षा जवानांना परत आणण्यात आले. सुरक्षा दलातील शेवटची टीम १ डिसेंबरला परतली. त्यानंतर सर्व जवानांना सुरक्षितपणे आपापल्या ठिकाणी परत पाठविण्यात आले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. दरम्यान, या जवानांनी केलेल्या खडतर सेवेनंतर प्रशासनाने तत्परता दाखवत त्या सर्वांना तिसऱ्याच दिवशी भत्ता अदा करण्यात आला. याकरिता जिल्हाधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पाठपुरावा केला. इतर जिल्ह्यांमध्ये निवडणुकीनंतर सहा-सहा महिने उलटूनही सुरक्षा कर्तव्याचा भत्ता मिळत नसल्याची ओरड असताना गडचिरोलीच्या प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेची सर्वत्र चर्चा आहे. 

३६७ अतिसंवेदनशील केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र दलाचे जवाननिवडणूक बंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलेले होते. जिल्ह्यातील ३६७ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आलेले असून, सी- ६० सीआरपीएफ शीघ्र कृती दल, विशेष कृती दल पथकाच्या ३६ तुकड्यांमार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशील जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात आले. त्यामुळे कोठेही अनुचित घटना घडली नाही.

छत्तीसगड, तेलंगणातील पोलिसांचीही मदतछत्तीसगड व तेलंगणातून माहाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शिरकाव करत असतात. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत कुठलीही अप्रिय घटना होऊ नये वासाठी छत्तीसगड व तेलंगणा सीमावर्ती भागात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले होते. शिवाय दोन्ही राज्यांतील पोलिसांना विनंती करुन तेथेही महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात नक्षल्यांच्या हालचालींवर तेथील जवान लक्ष ठेवून होते, या नक्षलविरोधी मोहिमेचाही चांगला फायदा झाला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PoliceपोलिसVotingमतदानGadchiroliगडचिरोली