झाडीपट्टीतील नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:26 IST2021-09-13T04:26:47+5:302021-09-13T04:26:47+5:30

आक्सापूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने कलावंतांचे रोजगार बुडाले आहेत. हातावर आणून पानावर खाण्याची कलावंताची परिस्थिती असल्याने कोरोनाच्या ...

Allow the presentation of the play in the bush | झाडीपट्टीतील नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाची परवानगी द्या

झाडीपट्टीतील नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाची परवानगी द्या

आक्सापूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने कलावंतांचे रोजगार बुडाले आहेत. हातावर आणून पानावर खाण्याची कलावंताची परिस्थिती असल्याने कोरोनाच्या महामारीत होणाऱ्या कार्यक्रमावर शासनाने निर्बंध आणलेत. त्यामुळे कलावंताचा संपूर्ण रोजगार बुडाला आहे. तेव्हा ग्रामीण कलावंताना मानधन सुरू करून झाडीपट्टीतील नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार सुभाष धोटे व गोंडपीपरी तहसीलदार यांना देण्यात आले.

गोंडपिपरी तालुका संघटनांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी राजुरा निर्वाचन क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी दिलेल्या निवेदनाचा गाभीर्याने विचार करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविल्या जाईल व शासन स्तरावर मागणी निश्चितपणे रेटून धरल्या जाईल, असे आश्वासन दिले. गेल्या दोन वर्षांपासून झाडीपट्टीचे नाट्यप्रयोग बंद असल्याने कालावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाकरिता परवानगी द्यावी व या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. तसेच कलावंताना उपासमारीच्या काळात मानधन देऊन सहकार्य करावे, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी गोंडपिपरी तालुका संघाचे अध्यक्ष अखिल भासारकर, सचिव अक्षय उराडे, राजकपूर भडके, विश्वास पुडके,स्वप्निल निमगडे, संदेश भासारकर उपस्थित होते.

120921\img-20210909-wa0149.jpg

आमदार यांना निवेदन देताना कलाकार

Web Title: Allow the presentation of the play in the bush