आयुर्वेदिक, होमिओपॅथी डॉक्टरांना कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:40+5:302021-04-24T04:28:40+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपला देश तोंड देत आहे. यामध्ये दररोज बेड्स, ऑक्सिजन व इंजेक्शनचा तुटवडा, अशा अनेक ...

आयुर्वेदिक, होमिओपॅथी डॉक्टरांना कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी द्या
चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपला देश तोंड देत आहे. यामध्ये दररोज बेड्स, ऑक्सिजन व इंजेक्शनचा तुटवडा, अशा अनेक अडचणी समोर येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या शहरामध्ये उपचारामध्ये तुटवड्याचे चित्र आहे. आरोग्य व्यवस्थेवर वाढणारा ताण पाहता आरोग्य सेवेत त्वरित आयुर्वेद, होमिओपॅथी व इतर उपचार पद्धतीतून कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्नांची गरज आहे. किंबहुना या उपचार पद्धतीचे कोविड केअर सेंटर संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सद्यस्थितीत नागरिकांना कोरोना उपचारासाठी न परवडणारे मोठे बिल भरावे लागत आहे. बेड, ऑक्सिजन व इंजेक्शनचा तुटवडा यामुळे जनता त्रस्त आहे. आयुर्वेद होमिओपॅथीमुळे कोरोनाबाधित रुग्णांना कमी खर्चात, कमी धावपळीत योग्य उपचार मिळतील. ज्या रुग्णांना एचआरसीटी स्केअर सौम्य आहे, ज्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची गरज नाही, अशा रुग्णाची धावपळ व खर्च वाचू शकतो. त्यामुळे यावर अभ्यास करून तज्ज्ञांची मदत घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.