भद्रावती नगरपरिषदेतर्फे लाभार्थ्यांना धनादेश वाटप
By Admin | Updated: February 21, 2016 03:14 IST2016-02-21T00:32:54+5:302016-02-21T03:14:50+5:30
रमाई आवास योजने अंतर्गत भद्रावती नगर परिषदेतर्फे लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.

भद्रावती नगरपरिषदेतर्फे लाभार्थ्यांना धनादेश वाटप
घरकूल योजना : १२६ घरकुलांना मंजुरी
भद्रावती : रमाई आवास योजने अंतर्गत भद्रावती नगर परिषदेतर्फे लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव व नगरसेवक राजू गैनवार उपस्थित होते. भद्रावती येथील संदीप खोब्रागडे, सुरेश कांबळे व मंचक भाग्यवत या लाभार्थ्यांना घरकूल बांधकामाचे धनादेश वाटप करण्यात आले.
रमाई आवास योजने अंतर्गत भद्रावती नगर परिषदेला ४६६ लाभार्थ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १२६ लाभार्थ्यांच्या घरकूल बांधकामाला मंजुरी प्राप्त झाली असून त्यापैकी ९७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. ११ घरकुलाचे काम प्रगती पथावर आहे व १८ घरकुलांना मंजुरी प्राप्त झाली आहे. त्याची कामे लवकरच सुरू होणार आहे. यासाठी टप्पाटप्प्याने शासनातर्फे अनुदान दिले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)