अगरबत्ती प्रकल्पातील प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र व धनादेश वाटप
By Admin | Updated: October 7, 2015 02:09 IST2015-10-07T02:09:21+5:302015-10-07T02:09:21+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील आगरझरी गावात ताडोबा अगरबत्ती प्रकल्पात...

अगरबत्ती प्रकल्पातील प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र व धनादेश वाटप
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील आगरझरी गावात ताडोबा अगरबत्ती प्रकल्पात वन्यजीव सप्ताह निमित्ताने सोमवारी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जी.पी. गरड यांचे हस्ते अगरबत्ती प्रकल्पात प्रशिक्षण घेणाऱ्या २० महिला व दोन सुपरवायझर यांना अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र व मानधनाचे धनादेश वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उपसंचालक (बफर) जी.पी. नरणे, सहाय्यक वनसंरक्षक कांचन पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर) एस.एस. शिंदे, अध्यक्ष इको विकास समिती, देवाडा व अडेगाव तसेच आगरझरी व देवाडा गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास जी.पी. गरड, मुख्य वनसंरक्षक, जी.पी. नरवणे (बफर), उपसंचालक यांच्या मार्गदर्शनातून मोहर्ली परिक्षेत्रातील आगरझरी गावात ताडोबा अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रकल्प अमलात आणण्याकरिता एस.एस. शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली (बफर) के.व्ही. धानकुटे, क्षेत्र सहायक, आगरझरी यांनी परिश्रम घेतले. प्रकल्पात आगरझरी गावातील २० महिलांना अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अगरबत्ती प्रकल्पामुळे २० महिला व दोन सुपरवायझर असे एकूण २२ लोकांना रोजगार मिळाला असून प्रति किलो रुपये १५ प्रमाणे मानधन दिले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)