आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप
By Admin | Updated: July 6, 2017 00:46 IST2017-07-06T00:46:10+5:302017-07-06T00:46:10+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबावर इतर योजनेंतर्गत एकूण २२ लाभार्थ्यांना आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप
भद्रावती : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबावर इतर योजनेंतर्गत एकूण २२ लाभार्थ्यांना आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. स्थानिक विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ६ लाख ३२ हजार ८५० रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
आत्महत्या कुटूंबामध्ये देवराव बापूराव घाटे नंदोरी, सोमित्रा श्रीकृष्ण विधाते धानोली, सुनिता विठ्ठल साठोणे खोकरी या तीन शेतकरी आत्महत्या प्रकरणात मंजूर झालेल्या अनुदानाचे प्रत्येकी एक लाखांचे धानादेश देण्यात आलेत. तर राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेंतर्गत नऊ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार तर आगीत घरांचे, गोठ्यांचे तसेच वीज पडून आणि आगीत जळून मृत्यू पावलेल्या जनावरांच्या १० लाभार्थ्यांना एकूण एक लाख ५२ हजार ८५० रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले.
कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याने शासनाने त्यांच्यावर असलेल्या संपूर्ण कर्जाची रक्कम परतफेड करून एक लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याने आमदार धानोरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ज्यांची जनावरे नैसर्गिक आपत्तीने दगावली अशांना शासनाव्यतिरिक्त अनुदान देण्यात यावे, अशा ठराव मंजूर करावा, असे निर्देश बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे यांना दिले. यावेळी तहसिलदार सचिन कुमावत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.