कोरपन्याचा सर्वांगीण विकास करणार

By Admin | Updated: October 30, 2014 22:50 IST2014-10-30T22:50:08+5:302014-10-30T22:50:08+5:30

तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना हा औद्योगिकदृष्ट्या विकसित झाला असला तरी या भागातील अनेक सुटू शकल्या नाहीत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या समस्या प्राधान्याने सोडवण्याला प्राधान्य देऊ,

All-round development of core strength | कोरपन्याचा सर्वांगीण विकास करणार

कोरपन्याचा सर्वांगीण विकास करणार

संजय धोटे यांचे प्रतिपादन : कोरपना येथे सत्कार
वनसडी : तेलगंणाच्या सिमेवरील कोरपना हा औद्योगिकदृष्ट्या विकसित झाला असला तरी या भागातील अनेक सुटू शकल्या नाहीत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या समस्या प्राधान्याने सोडवण्याला प्राधान्य देऊ, असा विश्वास राजुऱ्याचे नवनिर्वाचीत आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी कोरपना येथे सोमवारी आयोजित जाहीर सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी कोरपना बसस्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, अरुण मस्की, शिवाजी सेलोकर, रमेश मालेकर, कवडू जरीले, संजय मुसळे, किशोर बावणे, वाघुजी गेडाम, महादेव एकरे, सतिश उपलंचीवार, विशाल गज्जलवार, राजू घरोटे, वसंता गज्जलवार, पुरुषोत्तम भोंगळे, विनोद नवले, समीर पटेल, फारुख भाई, नुरभाई, मोसीमभाई, अरुण मडावी उपस्थित होते.
येथील सिंचन प्रकल्प, कापूस, सोयाबिन पिकासंबंधी भाववाढीच्या प्रश्नासह कोरपना शहर व तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, असे आ.धोटे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केले. कोरपना तालुक्यातील सिंचन समस्या, बसस्थानक, बस आगार, एसडीओ कार्यालय, एमआयडीसी, पारडी-खातेरा येथे पैनगंगा नदीवर पूल, गडचांदूर, आदिलाबाद रेल्वेमार्ग, शेत मालावर आधारित प्रक्रिया, उद्योग, कापूस- सोयाबिन पिकांना भाव, संकलन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, गावागावांत रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, विज्ञान महाविद्यालय आदि प्रश्नांकडे यावेळी हिवरकर यांनी प्रास्ताविकातून लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामदास कौरासे, मंगल बावणे, काकडे, आशिष ताजने, प्रविण साखरकर, शंकर किन्नाके, मल्लिकार्जुन गंगशेट्टीवार, प्रविण येलमुलवार, नागोराव सिडाम, बाबाराव राऊत, घनश्याम ताजने, किशोर रेंगुडवार, विलास पारखी, संदीप भोयर, अनिल मडावी, बाबाराव राऊत, नामदेव खाडे, अमित कुंभारे, ज्योेतीराम मंगाम, वामन झाडे, श्रीराम आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: All-round development of core strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.