बल्लारपुरातील सर्वच रस्ते सिमेंटचे होणार

By Admin | Updated: August 23, 2015 01:32 IST2015-08-23T01:32:27+5:302015-08-23T01:32:27+5:30

बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी आणणार असल्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री तथा बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी....

All roads in Ballarpur will be made of cement | बल्लारपुरातील सर्वच रस्ते सिमेंटचे होणार

बल्लारपुरातील सर्वच रस्ते सिमेंटचे होणार

सुधीर मुनगंटीवार : १२५ पैकी ३० कोटींचा विकासनिधी प्राप्त
बल्लारपूर : बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी आणणार असल्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री तथा बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी येथील नागरिकांना दिले होते. तद्वतच, या १२५ कोटी रुपयांतून शहराचा विकास कोणत्या पद्धतीने करायचा याबाबत लोकांची मते मागवून जनता दरबारात शहराचा विकास आराखडा दोन महिन्यापूर्वी मांडला होता. आणि ही निधी लवकरच आणू असे त्या सभेत मुनगंटीवार यांनी सांगितले होते.
दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यातील ३० कोटी रुपये आले असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी येथे बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना दिली. येथील बीटीएस परिसरातील रस्ता बांधकामाचे उद्घाटन तसेच वृक्षारोपण मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्यांनी भाषणातून ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी चंदनसिंह चंदेल होते. कुलदीपसिंह सूरी, दादा मुसा, रेणुका दुधे, शिवचंद ध्दिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती. बल्लारपूर शहरातील लहान मोठ्या सर्वच रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येईल, असे सांगत बल्लारपूरच्या विकासार्थ निधी कमी पडू देणार नाही असे पुनश्च एकदा येथील जनतेला आश्वासन केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: All roads in Ballarpur will be made of cement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.