शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पोलीस ठाणे सीसीटीव्हीने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यासाठी पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. अवैध वाहतूक रोखण्यासाठी  प्रादेशिक परिवहन व पोलीस या यंत्रणांनी चोखपणे काम करावे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील गुन्हेसिद्धीचा दर समाधानकारक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांचे काम उत्तम असून, गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी खास पथक निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार व सर्व ठाणेदार उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यासाठी पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. अवैध वाहतूक रोखण्यासाठी  प्रादेशिक परिवहन व पोलीस या यंत्रणांनी चोखपणे काम करावे. पोलीस दलाच्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रचार व प्रसिद्धी व अन्य उपक्रमांना निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे पोलीस अधीक्षकांना सूचविले.

दोषसिद्धीचा दर  ३५ टक्के-कोरोनाकाळात देशात गुन्हे वाढले आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारख्या गुन्ह्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०१९ मध्ये ४३ टक्के, २०२० मध्ये ४,२५३, तर सप्टेंबर २०२१ अखेर ३५ टक्के दोषसिद्धीचा दर असल्याचे आढावा बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्षाची पाहणी- बैठकीनंतर  पालकमंत्र्यांनी पोलीस विभागाच्या डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्षाची पाहणी केली. नियंत्रण कक्ष अत्याधुनिक करणे व गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पथकाला निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ. गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी व गुन्हे दर कमी होण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक साळवे यांनी वर्षभरातील कामकाजाचे सादरीकरण केले.

 

टॅग्स :PoliceपोलिसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार