भर दिवसा पडली त्याची वाघाशी गाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:32 IST2021-08-19T04:32:04+5:302021-08-19T04:32:04+5:30
आंबोली(चंद्रपूर) : चिमूर तालुक्यातील भिसी गावातील जुनी भिसी वॉर्ड परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याला शेतातून परत ...

भर दिवसा पडली त्याची वाघाशी गाठ
आंबोली(चंद्रपूर) : चिमूर तालुक्यातील भिसी गावातील जुनी भिसी वॉर्ड परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याला शेतातून परत घरी जात असताना पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. अचानक वाघाशी सामना झाल्याने शेतकरी अत्यंत भयभीत झाला. वाघ काही क्षणातच दुसऱ्या दिशेने निघून गेल्याने अनर्थ टळला. पण, या घटनेने भिसीवासीयात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
जुनी भिसी येथून अवघ्या शंभर मीटर अंतरावर पत्रू मासूरकर यांचे शेत आहे. शेतातून पत्रू मासूरकर घरी यायला निघाले असता डांबर रोडवर पत्रूची वाघाशी गाठ पडली. त्यावेळी इतका भयभीत झाला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तितक्यात भिसीकडून टाका गावाकडे जाण्यासाठी एक दुचाकी वाहन आले. तेव्हा वाघ बाजूला हटला. पत्रू संधी साधून शेतात माघारी गेला. जुनी भिसी वॉर्डातील लोकांना ही घटना कळताच अनेक लोक वाघ निघून गेला त्या दिशेने धावले. वाघ चांभारनाला स्मशानभूमीकडून जंगलाच्या दिशेने पसार झाला.