मद्यपी पोलिसांची रवानगी पहाडावर

By Admin | Updated: August 9, 2015 01:16 IST2015-08-09T01:16:14+5:302015-08-09T01:16:14+5:30

मद्यप्राशन करून रस्त्यावर तमाशा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची रवानगी जिवती तालुक्यातील पहाडावरील गावांत करण्यात आली आहे.

The alcoholic police's departure on the hill | मद्यपी पोलिसांची रवानगी पहाडावर

मद्यपी पोलिसांची रवानगी पहाडावर

चंद्रपूर: मद्यप्राशन करून रस्त्यावर तमाशा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची रवानगी जिवती तालुक्यातील पहाडावरील गावांत करण्यात आली आहे.
येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत दोन पोलीस कर्मचारी मूल येथून ग्रामपंचायत निवडणुकीचा बंदोबस्त आटोपून चंद्रपूरकडे येत असताना रस्त्यात त्यांनी मर्यादेच्या पलिकडे मद्यप्राशन केले. त्यामुळे झिंगलेले हे दोन कर्मचारी कसेबसे चंद्रपुरात पोहोचले. मात्र सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथील बसस्थानक चौकात त्यांचा तोल सुटला. दोनही कर्मचारी रस्त्यावर गडबडा लोळू लागले. परिसरातील नागरिक पोलीस कर्मचाऱ्यांचा हो ‘मद्य सोहळा’ एन्जॉय करीत होते. कुणी तरी एकाने खाकी वर्दीतील कर्मचाऱ्यांचा हा तमाशा आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. पाहता-पाहता अनेकांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर तो पोहचला. या प्रकाराची दखल खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी घेतली. त्यानंतर शनिवारी या दोनही कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी पहाडावर बदली करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The alcoholic police's departure on the hill