शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात ३७ मार्गांनी येते दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 11:37 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. लोकमतने केलेल्या निरीक्षणात चंद्रपूर सीमावर्ती भागातील तब्बल ३७ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक सुरू आहे.

ठळक मुद्देसर्व मार्ग पोलिसांना ज्ञात कारवाईचा केवळ फार्स

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. लोकमतने केलेल्या निरीक्षणात चंद्रपूर सीमावर्ती भागातील तब्बल ३७ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक सुरू आहे. हे सर्व मार्ग पोलिसांना ज्ञात आहे. केवळ नाममात्र कारवाई होत असल्यामुळे जिल्ह्यात दारूतस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे.दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, कुटुंबातील कलह थांबावा, घराघरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहावे, या उद्दात्त हेतूने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली. मात्र अंमलबजावणीत पोलीस यंत्रणा फितुर निघाली. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून मुबलक दारू येत आहे. परिणामी गल्लीबोळात दारू सहज उपलब्ध होत आहे. सीमावर्ती यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यात दारूबंदी नाही. दारूबंदी नसलेल्या तेलंगणा राज्याची सीमाही चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, जिवती या तालुक्यांना तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे, तर कोरपना तालुक्याला तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागून आहे. या तीनही तालुक्यात १२ मार्गाने दारूची चोरटी वाहतुक होत आहे. चंद्रपूर तालुक्याला घुग्घुस येथून यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागून आहे.वरोऱ्याला यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागून असून नागपूर-चंद्रपूर व नागपूर-वणी हा मार्ग वरोरा येथून जातो. या तालुक्यांत ११ मार्गाने दारूची तस्करी सुरू आहे. चिमूरला नागपूर व भंडारा जिल्ह्याची सीमा लागून आहे. ब्रह्मपुरी तालुक्याला भंडारा जिल्ह्याची सीमा लागून आहे. या दोन्ही तालुक्यात तब्बल १३ मार्गाने दारूची तस्करी सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीचे हेच ते मार्गचिमूर तालुक्यातील मार्गनागपूर-भिसी-चिमूर, पवनी-कान्पा-चिमूर/ नागभीड/ ब्रह्मपुरी/ सिंदेवाही, भंडारा - पवनी - भुयार -साठगाव (कोलारी), भिवापूर-जवळी-भिसी, नागपूर-उमरेड-नांद-भिसी-चिमूर, नांद (जि.नागपूर)-मिनझरी-मुडपा-खडसंगी, नागपूर-नंदोरी-कोरा-मंगरुळ-खडसंगी, सिरसी-गिरड-मंगरुळ-खडसंगी, उमरेड-सिरसी-गिरड-समुद्रपूर-जाम- चंद्रपूर/चिमूर, पवनी-मिस्टी-भुयार-चिमूर.कोरपना तालुकाआदिलाबाद-बेला-कोरपना, वणी-कोरपना, वणी-वनोजा-शिंदोला-कोरपना, कैलासनगर-विरुर-गाडेगाव-कोरपना, पायवाट- मेंडीगुडा-येलापूर-कोरपना, पायवाट-शंकरगुडा-शिवापूर-कोरपनाचंद्रपूर तालुकाबेलोरा-नायगाव-घुग्घुस, सिंदोला-मुंगोली-घुग्घुस,वर्धा नदी मार्गे - सिंदोला-नायगाव घाट-घुग्घुस,चांदूर(म्हातारदेवी)- घुग्घुस, जुगाद-वढा-घुग्घुस/चंद्रपूर.जिवती व राजुरा तालुकामेंडीगुडा-जिवती, भारी-इंदाना- जिवती, लेंडीगुडा - केरामेरी-जिवती. तेलंगणा-लक्कडकोट-राजुरा, तेलंगणा-विरुर(स्टे).- राजुरा, रात्रीला रेल्वे मार्गाने (दोन्ही बाजुने)ब्रह्मपुरी तालुकापवनी-सावरला-चोरगाव-ब्रह्मपुरी.लाखांदूर - वडसा-ब्रह्मपुरी.वैनगंगा नदी मार्गेइटान-भालेश्वर-ब्रह्मपुरीवरोरा तालुकानागपूर-खांबाडा-वरोरा, वणी-पाटाळा-वरोरा, खैरी(वडकी) सोईट-माढेळी-वरोरा, मानगाव-थोराना-वरोरा, मारडा (जि. यवतमाळ) -वरोरा, नंदीग्राम एक्स्प्रेस-(दोन्ही बाजुने)

प्रमुख मार्गावरील नाकाबंदी नावाचीचकाही प्रमुख मार्गावर जिल्हा पोलिसांनी चौक्या लावून नाकाबंदी केलेली आहे. तरीही या भागातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी होत आहे. पोलिसांना दारूच्या कारवाया दाखवायच्या असतात. त्या अनुषंगानेच या कारवाया करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पोलीस अधीक्षकांची वड्या तस्करांवर करडी नजरडॉ. महेश्वर रेड्डी हे नुकतेच चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले आहे. लहान-सहान दारूविक्रेत्यांना पकडण्यापेक्षा मोठ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे फर्मान त्यांनी सर्व यंत्रणेला दिलेले आहेत. तेव्हापासून दारू पकडल्यानंतर ती कुठून आली. याचा शोध घेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले आहे. मात्र ही कारवाई करताना ठाणेदारांसह यंत्रणेची चांगलीच अडचण होत असल्याचे समजते. त्यामुळे या कारवयांबाबत संभ्रम आहे.

कौन बनेगा करोडपती अन् चंद्रपूरची दारूच्दूरचित्रवाहिनीवर कौन कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. यामध्ये एका प्रश्नासाठी चार पर्याय सुचविले जातात. या मलिकेच्या आधारावर सोशल मीडियावर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीवर विनोद सर्वत्र व्हायरल केला जात आहे. यामध्ये ‘चंद्रपूर जिल्ह्यात एका फोनकॉलवर कोण आधी तुमच्या घरी पोहचेल, असा प्रश्न नमूद केला आहे. या खाली १. पिज्जा, २. पोलीस, ३. अ‍ॅम्ब्युलन्स, ४. दारू हे चार पर्याय दिलेले आहे. या संदेशावरून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसाठी पोलिसांवर लक्ष्य केल्याचे दिसून येते. दारूबंदीचा निर्णय चांगला असला तरी चंद्रपूर पोलीस त्याची अंमलबजावणी करण्यात कमी पडल्याचे जाणवते.

टॅग्स :liquor banदारूबंदी