विसापूरात गजर भक्तीचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:44+5:302021-02-05T07:35:44+5:30
विसापूर : सायंकाळच्या नयनरम्य वातावरणात गुलाबी थंडीमध्ये गजर भक्तीचा या भक्तिमय संगीत कार्यक्रमाने स्थानिक साई मंदिरातील परिसर भक्तिमय झाले ...

विसापूरात गजर भक्तीचा कार्यक्रम
विसापूर : सायंकाळच्या नयनरम्य वातावरणात गुलाबी थंडीमध्ये गजर भक्तीचा या भक्तिमय संगीत कार्यक्रमाने स्थानिक साई मंदिरातील परिसर भक्तिमय झाले होते.
विसापूर येथील वार्ड क्रमांक ५ मधील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विद्या उत्तम देवाळकर यांनी मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घेण्यात आला. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे सेवानिवृत्त डीवायएसपी श्रीराम तोडासे यांची प्रमुख उपस्थिती होती. या भक्ती भजन संध्याच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक संजय नाशिककर व विजया गेडाम व त्यांना साथ देण्यासाठी विसापूर येथील सुप्रसिद्ध तबला वादक सतीश कौरासे, शुभम देवाळकर, चंद्रपूरचे हार्मोनियम वादक पवन भास्कर तसेच पूर्णाजी खानोदे, आकाश सविता हे आपले वाद्यासोबत विचारपीठावर उपस्थित होते.
दरम्यान एक दिवसापूर्वी महिलांसाठी हळदी कुंकूवाचा कार्यक्रमसुध्दा साई मंदिरात घेण्यात आला. तो कार्यक्रम नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य सुरेखा इटनकर, विद्या देवाळकर यांनी संयुक्तरित्या आयोजित केला होता.