लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या आकाश वानखेडेचा सत्कार
By Admin | Updated: November 4, 2015 00:50 IST2015-11-04T00:50:02+5:302015-11-04T00:50:02+5:30
येथील पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व एक शिपायाने येथील ट्रॅक्टर चालकाला पैशाची मागणी केली.

लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या आकाश वानखेडेचा सत्कार
भद्रावती: येथील पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी व एक शिपायाने येथील ट्रॅक्टर चालकाला पैशाची मागणी केली. याविरुद्ध आकाश वानखेडे याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. आकाश वानखेडेच्या या धाडसाचे कौतुक करण्यासाठी येथील लाचलुचपत विभागाच्यावतीने आकाश वानखेडे यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला.
येथील कार्यरत ठाणेदार अशोक साखरकर, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड, शिपाई शंकर चौधरी या तिघांनीही येथील आकाश वानखेडे यांना रेती वाहतुकीसाठी पैशाची मागणी केली होती. वानखेडे यांनी पैशाची पूर्तता न केल्याने या तीनही पोलिसांनकडून दबाव येत होता. दरम्यान, वानखेडे यांनी याबाबत वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर या तिघांवरही कारवाई करण्यात आली. दोन अधिकारी व एका शिपायावर एकाच वेळी कारवाई होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
या कारवाईची दखल घेवून लाचलुचपत विभागातील किशोर सुपारे, पोलीस निरीक्षक भुसारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विठ्ठल बदखल यांनी आकाश वानखेडे यांनी शिल्ड, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)