बल्‍लारपूर येथे हवेतून ऑक्‍सिजन घेणारा प्‍लांट त्‍वरित उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:17+5:302021-04-26T04:25:17+5:30

चंद्रपूर : बल्‍लारपूर येथे हवेतून ऑक्‍सिजन घेणारा प्‍लांट त्‍वरित उभारण्‍यात यावा, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी ...

Air-oxygenated plant at Ballarpur should be set up immediately | बल्‍लारपूर येथे हवेतून ऑक्‍सिजन घेणारा प्‍लांट त्‍वरित उभारावा

बल्‍लारपूर येथे हवेतून ऑक्‍सिजन घेणारा प्‍लांट त्‍वरित उभारावा

चंद्रपूर : बल्‍लारपूर येथे हवेतून ऑक्‍सिजन घेणारा प्‍लांट त्‍वरित उभारण्‍यात यावा, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांना लेखी पत्र पाठविले असून त्‍यांच्‍याशी चर्चासुध्‍दा केलेली आहे. चंद्रपूर जिल्‍ह्यात कोरोनाची रूग्‍णसंख्‍या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी मृत्यूचा दर सुद्धा वाढत आहे. रूग्‍णांचे तसेच मृत्यूचे आकडे चिंता वाढविणारे आहे. रूग्‍णांना बेडस्, इंजेक्‍शन्‍स व औषधी वेळेवर उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे त्‍यांना जीव गमवावा लागत आहे. ऑक्‍सिजन व व्‍हेंटिलेटर बेडसची समस्‍या ही प्रमुख समस्‍या झाली आहे. ऑक्‍सिजनचा योग्‍य पुरवठा होत नसल्‍याने ही समस्‍या अधिक बिकट होत चालली आहे.

कोल्‍हापूरमध्‍ये असा प्‍लांट उभा करण्‍यात आला आहे. या प्‍लांटचे वैशिष्‍टय हे आहे की हवेतून हा प्‍लांट ऑक्‍सिजन घेतो, आपल्‍याला ऑक्‍सिजन रिफिलिंग करण्‍याची गरज नाही व तसेच आपल्‍याला लिक्‍विड ऑक्‍सिजन आणण्‍याची गरज नाही. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन स्‍थायी स्‍वरूपामध्‍ये अनेक वर्षे हा ऑक्‍सिजन प्‍लांट कामी येऊ शकतो. या प्‍लांटचे आयुष्‍य ३० वर्षे सांगितले गेले आहे. कोरोनाचे संकट जर दीर्घकाळ राहिले तर हा प्‍लांट दीर्घकाळ कामी येईल. या प्‍लांटच्‍या माध्‍यमातून रूग्‍णांना आवश्‍यकतेनुसार ऑक्‍सिजनचा पुरवठा करता येईल असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. यासंदर्भात आपण सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांच्‍याशी चर्चा केली असून त्‍यांनी सुद्धा जिल्‍हा प्रशासनाला याबाबत सूचना दिल्‍या असल्‍याबाबत आपणास माहिती दिल्‍याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

Web Title: Air-oxygenated plant at Ballarpur should be set up immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.