मूलमध्ये कृषी सप्ताहानिमित्त कार्यक्रम
By Admin | Updated: July 5, 2015 00:51 IST2015-07-05T00:51:14+5:302015-07-05T00:51:14+5:30
व्यापक दृष्टिकोनातून केवळ समाज कार्यासाठी संस्काराला रोजगाराची जोड देणारी शिक्षण संस्था स्व.वि.तु. नागापुरे यांनी निर्माण केली.

मूलमध्ये कृषी सप्ताहानिमित्त कार्यक्रम
भरगच्च उपस्थिती : समाजसेवा करणारे विद्यार्थी घडविणार
मूल : व्यापक दृष्टिकोनातून केवळ समाज कार्यासाठी संस्काराला रोजगाराची जोड देणारी शिक्षण संस्था स्व.वि.तु. नागापुरे यांनी निर्माण केली. या संस्थेमध्ये शिक्षण घेऊन समाजसेवा करणारे विद्यार्थी यातून घडत आहेत, घडत राहणार आहे. आणि ही संस्था पुढे नेण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे पूर्ण करीत आहेत, असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुर्लीधर चांदेकर यांनी व्यक्त केले.
स्व. वि.तु. नागापुरे सामाजिक ्रकार्य व सेवा प्रतिष्ठाणतर्फे कृषी सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद््घाटक म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार तथा शिक्षण महर्षी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब वासाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष संजय वासाडे, उपाध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अॅड. अनिल वैरागडे, सदस्य दि.म. एडलावार, प्राचार्य डॉ. अ.ह. वानखेडे, प्राचार्य डॉ. बसवराज, सदस्य र.सो. पडोळे, ते.क. कापगते, अॅड. प्रणव वैरागडे आदी उपस्थित होते.
स्व. नागपुरे यांनी काढलेल्या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यांचे स्मारक मूलमध्ये उभारण्याचा संकल्प केला आहे. या संस्थेमध्ये पुणे- मुंबईकडे दिले जाणार नवीन अभ्यासक्रमाचे शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांना दिले जाईल, असेही वासाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय वासाडे, उपाध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे यांनी आपले विचार व्यक्त केले तर स्व.वि.तु. नागपुरेजींनी केलेल्या कार्याचा आढावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अॅड. अनिल वैरागडे यांनी उपस्थितांसमोर मांडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. अनिता वाळके, प्रा.आर.ए. बुरांडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
जिवती येथे
कार्यक्रम
जिवती : वसंंतराव नाईक यांच्या जयंती समारोहनिमित्त पंचायत समिती जीवतीच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या कृषी जागृती सप्ताहाचे उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी संदीप गुडशेलवार यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांचे प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे, विस्तार अधिकारी (कृषी) आर.आर. देशमुख, मंडळ कृषी अधिकारी (प्रभारी) एम.जे. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.