कृषी सेवकाने केली शेतकऱ्यांकडून अतिरिक्त वसुली
By Admin | Updated: November 25, 2014 22:53 IST2014-11-25T22:53:03+5:302014-11-25T22:53:03+5:30
तालुक्यातील म्हातारदेवी येथील कृषी सेवकाने शेतकऱ्यांची फसवणूक करीत त्यांच्याकडून अतिरिक्त पैशांची वसुल केली आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली

कृषी सेवकाने केली शेतकऱ्यांकडून अतिरिक्त वसुली
चंद्रपूर : तालुक्यातील म्हातारदेवी येथील कृषी सेवकाने शेतकऱ्यांची फसवणूक करीत त्यांच्याकडून अतिरिक्त पैशांची वसुल केली आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी कपासी बियाणाचे प्रात्याक्षिक करण्यासाठी बियाणे देण्यात आले होते. मात्र कृषी सेवकाने प्रात्याक्षिकाचे बियाणे अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांकडू प्रति बॅग २०० रुपये प्रमाणे घ्यावयाचे असतानाही ४०० ते ५०० रुपये प्रमाणे वसुल केले. एवढेच नाही तर, कपसीच्या बियाणावर पाच हजार रुपयांची औषध व खतांची किट मिळणार आहे असे सांगून केवळ दोन हजार रुपयांचे औषध देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सध्या रब्बी हंगामासाठी प्रात्याक्षिकासाठी म्हातारदेवी येथील १५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. परंतु १५ पैकी केवळ ५ शेतकऱ्यांना बियाणे देण्यात आले.यासंदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ( प्रतिनिधी)