शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

विदर्भातील कृषी केंद्रसंचालक सरकारच्या 'साथी पोर्टल' विरोधात एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:43 IST

विक्रेत्यांच्या अडचणी वाढणार : १६ सप्टेंबरला कडकडीत बंद पाळणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने बियाणे विक्री साखळीतील उत्पादक कंपनी ते वितरक आणि किरकोळ विक्रेता अशा सर्वांनाच 'साथी पोर्टल'वर नोंदणी बंधनकारक केली आहे. या निर्णयाविरोधात एकत्र येत कृषी केंद्रसंचालकांनी येत्या १६ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व कृषी केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने बियाणे वितरणातील सर्व टप्प्यांवर नोंदणीची सक्ती केली आहे. यामध्ये उत्पादक कंपनीपासून ते वितरक आणि गावस्तरावरील कृषी सेवा केंद्रधारकांपर्यंत सर्वांनी बियाणे विक्रीची नोंद 'साथी पोर्टल'वर करणे अनिवार्य आहे. सरकारच्या मते, काही बियाणे कंपन्या १०० किलो ब्रीडर सीडपासून क्षमतेपेक्षा अधिक बियाणे तयार केल्याचे दर्शवीत विक्री करतात. यात शेतकऱ्यांची फसवणूक होते. हे रोखण्यासाठी 'साथी' पोर्टलची रचना करण्यात आली आहे. या पोर्टलवर ब्रीडर सीडपासून बीजोत्पादनापर्यंत सर्व टप्प्यांची माहिती नोंद‌विणे बंधनकारक करण्यात आले आहे. फसवेगिरी उत्पादक कंपन्यांच्या पातळीवर होत असताना सर्वसामान्य कृषी सेवा केंद्रधारकांना या प्रक्रियेत सामावून घेणे अन्यायकारक असल्याचा आरोप अॅग्रो डीलर्स असोसिएशनने या पार्श्वभूमीवर केला आहे. महाराष्ट्रात सुमारे ७० हजार कृषी सेवा केंद्रधारक कार्यरत आहेत. पोर्टलवरील सक्तीमुळे त्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागेल, असा असोसिएशनचा दावा आहे.

असे आहेत आक्षेप

ग्रामीण भागातील ७० टक्के विक्रेत्यांकडे कामकाजासाठी संगणक नाही. भारनियमन व विजेच्या समस्या आहेत. बीजोत्पादन कमी व बियाणे जास्त अशा कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. ब्रीडर सीड ते बीजोत्पादन व पॅकिंग, विपणन हे सारे कंपनीस्तरावर होते. त्यामुळे कंपनीस्तरावरच याला चाप बसण्यासाठी धोरण आखणे गरजेचे होते. त्याऐवजी सरसकट सगळ्यांना 'साथी पोर्टल'ची सक्ती करणे चुकीचे असल्याचे विदर्भातील कृषी व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भGovernmentसरकारfarmingशेतीFarmerशेतकरी