महसूल कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST2021-05-08T04:29:07+5:302021-05-08T04:29:07+5:30
१० मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन बल्लारपूर : गोंडपिपरी येथील महसूल सहायक सुनील चांदेवार यांच्यावरील एफआयआर रद्द ...

महसूल कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच
१० मे रोजी संपूर्ण जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन
बल्लारपूर : गोंडपिपरी येथील महसूल सहायक सुनील चांदेवार यांच्यावरील एफआयआर रद्द न झाल्यास, तसेच बल्लारपूर, गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांची बदली करून निलंबनाची कारवाई न झाल्यास संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात १० व १२ मे रोजी लेखणी बंद आंदोलनाची भूमिका महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही काळी फिती लावून निषेध नोंदवून काम केले व घोषणाबाजी केली. या दरम्यान उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने बल्लारपूर ठाण्यात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व विभागीय अध्यक्ष यांनी कोविड नियमाचा भंग करून दालनात येऊन धमकी दिल्याने त्यांच्यावर भारतीय दंड विधान १८८ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे चाललेले आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. याशिवाय ७ मे रोजी संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजू धंदे यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना निवेदन देऊन कर्मचाऱ्याविरुद्ध दाखल केलेला खोटा एफआयआर रद्द करून उपविभागीय अधिकारी डव्हळे यांना निलंबित करण्याची मागणी आलेली आहे.