कृषी विभाग लिपिक संघटनेचे आंदोलन
By Admin | Updated: July 6, 2017 00:48 IST2017-07-06T00:48:40+5:302017-07-06T00:48:40+5:30
राज्यातील शासकीय कृषी विभागातील लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष ...

कृषी विभाग लिपिक संघटनेचे आंदोलन
कृषी अधिकाऱ्यांना निवेदन : लेखणीबंद आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यातील शासकीय कृषी विभागातील लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्गं संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारच्या सुटीत कर्मचाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे यांना दिले.
कृषी कर्मचाऱ्यांना नवनिर्मित विभागात कायमस्वरूपी वर्ग करण्यात यावे, लिपिक वर्गाच्या प्रस्तावित आकृतीबंधाला मंजूरी देण्यात यावी, रिक्त पदे पदोन्नतीने तसेच नामनिर्देशनाने त्वरित भरण्यात यावे, सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यात यावी, संघटना कार्यालयासाठी तसेच तात्पुरत्या निवासाकरिता पुणे तसेच संभागीय मुख्यालयी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिजपक संवर्गं संघटनेतर्फे सदर मागण्या सोडविण्यासाठी अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सदर आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्याची पूर्तता त्वरीत केली नाही तर ११ जुलै रोजी लेखणीबंद आंदोलन कण्याचा ईशाराही जिल्हा कृषी अधिकारी डॉ.अ.रा.हसनबादे यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात एस.डी.बोधाने, बी. जी. ढिमोले, सी. व्ही. कोतपल्लीवार, एम.आर.करपे, एस.एस.उके,विद्या तुराणक, एस. एम. कांबळे, विभूती मोहुर्ले, मंदा धात्रक, नाना भोगेकर, अनिल पोठे, मनोज पोगूलवार, रविसिंग ठाकुर, रूपकुमार उगे, दीक्षित सूरज पाटील, पंकज धनकर, व्ही.ए.भगत उपस्थित होते.