शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत प्रवेशबंदी केल्याने सीमावर्ती शेतकऱ्यांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 19:03 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला. त्यामुळे सात गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी वैनगंगा नदी पुलावर ब्रह्मपुरी-वडसा मार्गावर दीडतास चक्का जाम आंदोलन केले.

ठळक मुद्देप्रवेशबंदी हटवा आश्वासनानंतर केला मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: ब्रह्मपुरी शहरात कोरोनाचा रूग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना थेट गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश नाकारला. त्यामुळे सात गावातील संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी वैनगंगा नदी पुलावर ब्रह्मपुरी-वडसा मार्गावर दीडतास चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी दूध, दही, भाजीपाला विक्री व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहरात दररोज ये-जा करतात.

नागपूर शहरातून जीवनावश्यक वस्तू घेवून येणारी वाहने ब्रह्मपुरी मागार्नेच वडसा शहरात प्रवेश करतात. मात्र, ब्रह्मपुरीत कोरोना रूग्ण आढळताच गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वैनगंगा नदीपूल ओलांडून ८ किमी अंतरावरील वडसा शहरात प्रवेशबंदी लादली. परिणामी ब्रम्हपुरी तालुक्यातील हरदोली, चिंचोली, चिखलगाव, लाडज, सोंद्री, सोनेगाव, सावलगाव येथील शेतकऱ्यांना दूध, दही, भाजीपाला व अन्य शेतमाल वडसा शहरात विकण्याचा मार्ग बंद झाला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी वैनगंगा पुलावर झाडे, लाकूड व दगड टाकून चक्काजाम आंदोलन सुरू केले. यानंतर वडसा तहसीलदार, मुख्याधिकारी, ब्रह्मपुरी तहसीलदार विजय पवार, वडसा व ब्रम्हपुरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन देताच मार्ग मोकळा केला.सात गावांमध्ये कोरोनाचा रूग्णच नसताना बंदी का ?वैनगंगा नदीकिनारी वसलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सात गावांची नाळ गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहराशी जोडली आहे. या शहरातील बाजारपेठेत दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. हरदोली, चिंचोली, चिखलगाव, लाडज, सोंद्री, सोनेगाव, सावलगाव येथे कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही. त्यामुळे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट प्रवेशना कारणे अन्यायकारक आहे, अशी नाराजी शेतकऱ्यांनी लोकमतजवळ व्यक्त केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagitationआंदोलन